‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली एका नव्या वादात अडकली आलं आहे. तिची सावत्र मुलगी ईशा वर्माची चार वर्ष जुनी पोस्ट व्हायरल झाली ज्यामध्ये अभिनेत्रीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ईशाने दावा केला होता की जेव्हाही तिने अश्विन वर्माशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिनेत्रीने तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. आता एका मुलाखतीत तिने काही नवे धक्कादायक दावे केले आहेत. रुपालीने ईशाच्या आरोपांवर अद्याप काही भाष्य केले नाहीत. मात्र तिचा पती अश्विनने ईशाचे दावे फेटाळून लावले आहेत. अशातच आता ईशाचा एक नवा व्हिडीओ अधिक चर्चेत आला आहे. (rupali ganguly step daughter)
ईशाने हा व्हिडीओ शेअर करत, रुपालीबरोबर सुरक्षित नसल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिचे दु:ख पूर्णपणे दिसून येत आहे. तसेच तिने या व्हिडीओमध्ये रुपालीच्या मुलाचीदेखील माफी मागितली आहे. हा व्हिडीओ शेअर करत ईशा म्हणाली की, “मी आता २६ वर्षांची झाले आहे. पण सगळ्या आठवणी आजही माझ्यासोबत आहेत. या सर्व घटना जरी भूतकाळात झाल्या असल्या तरीही त्या भविष्यात व वर्तमानात खूप त्रास देतात. मला त्रास देणाऱ्यांना मी उत्तर द्यायचे ठरवले. अशा लोकांनी माझ्या आईला खूप त्रास दिला, ज्यांच्यावर मी खूप प्रेम करते आणि मलादेखील खूप त्रास दिला”.
पुढे ईशाने सांगितले की, “त्यांनी मला निवडले नाही. त्यांनी मला सोडले, माझा अपमान केला आणि माझ्या असुरक्षिततेच्या चर्चा केल्या. या सगळ्यामुळे मी माझ्याबद्दल कधीही चांगला विचार करु शकले नाही. त्यांनी माझी कधीही माफी मागीतली नाही. माझ्या वडिलांची प्रतिक्रिया पाहून मला धक्का बसला. त्यांनी देखील माझ्या मानसिक स्थितीची मस्करी केली. माझ्या वडिलांनी मला कधीही पाठिंबा दिला नाही. माझ्यासाठी हे खूप धक्कादायक होते”.
यानंतर तिने रुपालीचा मुलगा रुद्रांक्षबद्दलदेखील भाष्य केले आहे, “ती म्हणाली की, “या सगळ्यामुळे जर कोणाला त्रास झाला तर मी माफी मागते. काही ठिकाणी खूप काही चुकीचं समोर आलं आहे जे मी आता सुधारू शकत नाही. रुद्रांश मी तुझ्यावर खूप प्रेम करते. बाबा तुझ्याशी तरी प्रेमाने वागत असतील अशी अपेक्षा आहे. पण माझा त्यांच्याबाबतीत असणारा अनुभव खूप वेगळा आहे”.
पुढे ईशा म्हणाली की, “आम्ही तिघं भावंडं एकत्र मोठे झालो आहोत. पण आमच्या तिघांचा एकत्रितपणे एकही फोटो नाही. आम्हाला एकत्र आणणं ही वडिलांची जबाबदारी होती. पण त्यांनी हे कधीही केले नाही. मला वडिलांनी बोलू दिलं नाही. तसेच मी रुपालीबरोबर सुरक्षिततेची भावना आली नाही. मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही माझी कधीही बाजू घेतली नाही. मला वडिलांप्रमाणे मोठी निर्माती व दिग्दर्शिका होण्याची इच्छा होती पण मला त्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही”. दरम्यान आता या प्रकरणाला कोणतं वळण लागणार? हे पाहण्यासारखं आहे.