अभिनेता आरोह वेलणकरने ‘रेगे’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेची इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली. यानंतर ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमात सहभागी झाल्याने आरोह घराघरांत लोकप्रिय झाला. चित्रपट, रंगभूमी, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने काम केलेलं आहे. अभिनयाप्रमाणेच तो सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतो याशिवाय अनेक राजकीय मुद्द्यांवर तो भाष्य करत असतो. सोशल मीडियाद्वारे तो अनेक राजकीय व सामाजिक विषयावर भाष्य करत असतो. अशातच अभिनेत्याने एका लान मुलीची मदतीसाठीची पोस्ट शेअर केली आहे. आरोहने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे आणि मदतीचे आवाहनही केलं आहे. (Aroh Welankar Appeal for Friend Daughter Help)
आरोहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “कृपया माझ्या मित्राला मदत करा” अशी एक पोस्ट आणि मित्राच्या लहान मुलीचा शेअर फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “प्रिय सहकारी, आज, मी फक्त एक सहकारी म्हणून नाही तर एक मित्र म्हणून संपर्क साधत आहे. ज्याला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे. माझ्या मित्रांच्या १९ महिन्याच्या मुलीला स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफीचे निदान झाले आहे. या दुर्मिळ अनुवांशिक विकारामुळे तिची चालण्याची, अन्न गिळण्याची आणि श्वास घेण्याची क्षमता हिरावून घेतली जाण्याचा धोका आहे”.
यापुढे त्याने मित्राचे म्हणणं मांडत म्हटलं आहे की, “पालक म्हणून, वेळ निघून जात आहे हे जाणून आपल्या मुलाचे दुःख पाहण्यापेक्षा हृदय पिळवटून टाकणारे दुसरे काहीही नाही. उपचार उपलब्ध आहे, परंतु आम्हाला पुढील पाच महिन्यांत या उपचारांची रक्कम जमवायची आहे, अन्यथा तिला कायमचे अपंगत्व येऊ शकते. असहाय्यतेच्या या क्षणी, माझे सहकारी अधिकारी, मी तुम्हा सर्वांकडे मदत मागत आहे. मी विभागामध्ये एक क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे आणि तुमच्या समर्थनाची विनंती करत आहे. मी इतर सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल गोळा केलेल्या माहितीच्या आधारे ज्यांनी यशस्वीरित्या पैसे उभे केले आहेत”.
यापुढे यात असं म्हटलं आहे की, “मला माहीत आहे की राजस्थान सरकार आणि अंमलबजावणी संचालनालयात ही एक प्रमाणित पद्धत आहे. मला समजले आहे की आपल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या आहेत, परंतु मला आशा आहे की तुम्ही माझ्या मुलीला निरोगी जीवनाची संधी मिळवून देण्यास तिला पात्र आहे” दरम्यान, या पोस्टद्वारे आरोहने त्याच्या मित्राच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे.