अभिनेत्री हेमांगी कवीने नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिजमध्ये विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू दाखवली. रंगभूमीवर तिचं ‘जन्मवारी’ नाटक सध्या सुरु असून नुकतीच रवि जाधव दिग्दर्शित ‘ताली वेबसीरिजमध्ये ती झळकली होती. अभिनेत्रीने जरी निवडक भूमिका केली असली, तरी तिच्या प्रत्येक भूमिका या लक्षवेधी ठरल्या आहे. अभिनयाबरोबर तिने अनेक नृत्य व विनोदी कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली. एरव्ही मराठीसह हिंदी कलाक्षेत्रात वावरणाऱ्या हेमांगीने आता हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. याचा खुलासा करताना तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. (Hemangi Kavi says she not works in Hindi Industry)
सोशल मीडियावर हेमांगी खूपच सक्रिय असून ती याद्वारे अनेक फोटोज व व्हिडिओज करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. एवढंच नव्हे, तर ती अनेक मुद्द्यांवर आपलं परखड मत देखील व्यक्त करताना दिसली. नुकतंच हेमांगीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपण यापुढे हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
हे देखील वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ने ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे, तेजश्री प्रधान नव्हे तर जुई गडकरीला प्रेक्षकांची पसंती
हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला तिचा फोटो दिसत असून फोटोसोबत तिने “तू हिंदी आणि मालिकांमध्ये काम का करत नाही?” असा प्रश्न लिहिला. त्यावर उत्तर देताना तिने समीर चौघुलेंचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील एक व्हिडिओ जोडला. व्हिडिओत समीरचं पात्र तोडकी मोडकी हिंदी बोलताना दिसतात. या व्हिडिओला तिने “हे सत्यघटनेवर आधारित नाही.” असं कॅप्शन देत समीरचे कौतुक केलं आहे.
हे देखील वाचा – ‘तारक मेहता…’मधून जेठालाल उर्फ दिलीप जोशींनी घेतला ब्रेक, चाहत्यांना धक्का, पण यामागचं नेमकं कारण काय?
तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांसह कलाकारांनी यावर अनेक मजेशीर कमेंट करत आहे. एका चाहतीने कमेंट करत म्हटलंय, “ताई तू पण ना…एकदम पंच टाक्या”. तर “खरंच तो उत्कृष्ट नट असून मी माझं हसू थांबवू शकत नाही”, अशी कमेंट एका चाहतीने केली.