हिंदी टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलं आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या शोचे चाहते आहे. शिवाय, शोमधील कलाकारांची एक वेगळीच फॅन फॉलोविंगदेखील बनली आहे. अशातच या शोबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी काही काळासाठी शोमधून ब्रेक घेतला आहे. दिलीप यांच्या या निर्णयाने त्यांचे चाहते निराश झाले आहे. (Dilip Joshi aka Jethalal take a break from TMKOC)
दरम्यान, दिलीप जोशी यांच्या मालिकेबाबत अनेक बातम्या येत होत्या. मध्यंतरी ते हा शो सोडणार असल्याच्या चर्चादेखील सुरु होत्या. पण आता अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी ‘ई-टाईम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यांनी काही काळासाठी शोमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसह टांझानिया व दुबईच्या धार्मिक सहलीवर गेले आहेत.
हे देखील वाचा – दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली?, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन
स्वामीनारायण मंदिरात आयोजित एका कार्यक्रमासाठी ते सध्या टांझानियातील दारे सलाममध्ये आहे. सोशल मीडियावर फासरे सक्रिय नसणारे दिलीप यांनी त्यांच्या या सहलीचे कोणतेही फोटो पोस्ट केलेले नाहीत. मात्र, त्यांनी महिन्याभरापूर्वी केलेली एक पोस्ट अजूनही त्याच्या धार्मिक प्रवासाबद्दल खूप काही सांगते. या व्हिडिओमध्ये त्यांनी अबुधाबी येथे होणार्या स्वामीनारायणांच्या BAPS समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमाचे आमंत्रण देत आहे.
हे देखील वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ने ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे, तेजश्री प्रधान नव्हे तर जुई गडकरीला प्रेक्षकांची पसंती
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल बोलायचे झाल्यास, गोकुळधामच्या लोकांनी मोठ्या जल्लोषात बाप्पाचे स्वागत केले. यावेळी जेठालालने आपण गणेशोत्सवात सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बाप्पाचे स्वागत करून पहिली आरती केल्यानंतर जेठालाल इंदूरला रवाना होतील, असे दाखवण्यात आले आहे.