बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ने ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे, तेजश्री प्रधान नव्हे तर जुई गडकरीला प्रेक्षकांची पसंती

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 30, 2023 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi serial TRP rating latest update

टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ने ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे

छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकवर्गाकडून नेहमीच भरभरुन प्रेम मिळालं आहे. दिवसभराच्या कामातून विश्रांती मिळाल्यानंतर कुटुंबातील मंडळी एकत्र बसून मालिका आवर्जून पाहतात. सध्या स्टार प्रवाह व झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षक अधिकाधिक पाहत असल्याचं चित्र आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये अगदी पुढे आहेत. याच वाहिनीवरील सध्या दोन मालिकांची जोरदार हवा पाहायला मिळत आहे, ती म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘ठरलं तर मग’. (Marathi serial TRP rating latest update)

गेल्या अनेक दिवसांपासून ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर होती. मात्र, काही आठवड्यांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सुरु झाली आणि तिथपासून अवघ्या दोनच आठवड्यात मालिका पहिल्या स्थानावर आली होती. मात्र आता हे चित्र बदलेलं दिसत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेने ‘प्रेमाची गोष्ट’ला मागे टाकत पुन्हा एकदा टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. तर ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका दुसऱ्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा – “माध्यम कोणतंही असलं तरी…”, मराठी कलाकारांबाबत शशांक केतकरचं मोठं विधान, अभिनेता म्हणाला, “मराठी कलाकार…”

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘आई कुठे काय करते’ पाचव्या स्थानावर कायम आहेत. टीआरपीच्या यादीत स्टार प्रवाहच्या काही मालिका पहिल्या दहा टॉप मालिकांच्या यादीमध्ये कायम आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळतं. आतापर्यंतच्या भागात प्रेक्षकांना सायलीच्या भूतकाळाबद्दल अनेक गोष्टी उलगडताना पाहायला मिळत आहेत.

हे देखील वाचा – “जास्त दारू प्यायली का?”, सुकन्या मोनेंच्या ‘त्या’ व्हिडिओवर महिलेची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “ही नशा…”

तर याच महिन्यात सुरु झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आता वेगळ्या वळणावर आली असून नुकतंच मालिकेत खलनायिकेची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. पुढील आठवड्यात या दोन मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये कोणत्या स्थानावर असणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags: marathi malikapremachi goshtaTharla Tar MagTRP
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
anushka shrama second baby

दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली?, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.