रितेश आणि जेनेलिया त्यांच्या केमिस्ट्रीमुळे कायमच चर्चेत असतात. महाराष्ट्रचे लाडके दादा,वाहिनी म्हणून त्यांनी आपलं एक वेगळं स्थानच निर्माण केलं आहे. रील लाईफ ते रिअल लाईफ हा त्यांचा प्रवास त्यांनी बऱ्यचवेळा त्यांच्या प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. त्यांच्या सोशल मीडियावरून एकमेकांसोबतचे बरेच फोटोज, मजेशीर रिल्स ते शेअर करत असतात.(Genelia Deshmukh)
त्याच सोबत त्यांच्या मुलांची ही सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु असते. त्यांचे संस्कार, ते जपत असलेली संस्कृती या गोष्टींचं नेटकरी कायमच कौतुक करतात.प्रत्येक सण, उत्सव साजरे करणं असूदेत,किंवा मोठ्यांना आदर देणं असूदेत त्यांच्या या वागणुकीबद्दल रितेश,जेनेलियाच देखील पालक म्हणून कौतुक होताना पाहायला मिळत.त्यांच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी देखील रितेश जेनेलिया कौतुकाने शेअर करतात.
पाहा देशमुख कुटुंबाचे खास क्षण (Genelia Deshmukh)
सध्या IPL च्या मॅच सुरु आहेत, आणि IPL चा क्रेज मोठ्या प्रमाणवर आहे, जेनेलिया रितेश आणि मुलांसोबत IPL ची मॅच बघायला केली होती. त्याचे व्हिडिओस तिने तिच्या इंस्टग्राम स्टोरी वरून शेअर केले आहेत. आणि या व्हिडीओना तिने IPL डेट विथ माय बॉईज असं कॅप्शन दिल आहे. बरीच धमाल करताना ते या व्हीडोजमध्ये पाहायला मिळत आहेत. (Genelia Deshmukh)
हे देखील वाचा : १०० दिवसांनंतर ही न्यू यॉर्क मध्ये चालू आहे ‘वेड’ ची हवाजिनिलियाने शेअर केला व्हिडिओ
करिअर,लग्न, संसार सर्व गोष्टी उत्तम सांभाळण्याची कसरत रितेश आणि जेनेलिया उत्तम पार पाडत आहेत. वैयक्तिक आयुष्यासोबत त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातही चांगले यश मिळवले आहे. जवळ जवळ २० गेले वर्ष त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यांच्या या यशामध्ये नुकताच ज्या चित्रपटाने मोठा हातभार लावला तो चित्रपट म्हणजे वेड.