सध्या मनोरंजन क्षेत्रात कोणाची हवा आहे, कोणी वेड लावलंय हे वेगळं सांगायची गरज नाही. अनेक चित्रपट येतात जातात पण काही चित्रपटांचे काही भाग इतके गाजतात की त्यांना थांबणं माहित नाही उदाहरण द्याच झालं तर अशी ही बनवा बनवी चित्रपटाचं घ्या आजही त्याचे विनोद जिवंत आहेत. अजय अतुल ची गाणी आहेत, माधुरीचा डान्स आहे अशा अनेक चित्रपटातील गाणी किंवा एखादा सीन ,डान्सची स्टेप आजही अजरामर आहे.१०० दिवसांपूर्वी आलेल्या वेड या चित्रपटात बाबतीत असच झालेलं दिसतंय.(Ritesh Deshmukh Ved Movie)
हे देखील वाचा – नक्की कावेरी करत काय होती?कावेरीचा मजेशीर व्हिडिओ पाहून प्रेक्षक म्हणाले…
महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून प्रसिद्ध झालेले रितेश आणि जिनिलिया हा वेड लावणारा वेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. या लाडक्या जोडीला प्रेम मिळालंच पण चित्रपटातील वेड लावलंय हे गाणं आणि त्या गाण्याची हुक स्टेप यांनी सुद्दा प्रेक्षकांना वेड लावलेलं पाहायला मिळालं. १०० दिवसांच्या या वेड च्या प्रवासानिम्मित अभिनेत्री जिनिलिया आणि रितेश फॅमिली सोबत न्यू यॉर्क मध्ये साजरा करत आहे न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर रितेश आणि त्याची मुलं वेड चित्रपटातील हुक स्टेप करतानाचा व्हिडिओ जीनिल्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केला आहे.तर न्यू यॉर्क असो किंवा मुबंई वेड तर लावणारच असं कॅप्शन सुद्दा जिनिलियाने त्या व्हिडिओला दिल आहे.
वेड चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख ने दिगदर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत आपलं पहिलं पाऊल ठेवलं. आणि त्याच्या पाहलियाच कलाकृतीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि मराठी चित्रपट अजून समृद्ध होत गेला त्याच प्रमाणे मराठीतील सगळ्या चित्रपटांनी प्रेक्षकांना असच वेड लावावं एवढंच.(Ritesh Deshmukh Ved Movie)