अभिनेता, कवी, गायक आणि विश्लेषक म्हणून बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता म्हणजे पियुष मिश्रा. बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीचे अभिनेते म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे.
एक अभिनेते म्हणून पियुष मिश्रा यांनी आपलं खाजगी आयुष्य मीडियापासून कायमच लांब ठेवलं. मात्र एका मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.
पियुष मिश्रा यांनी सांगितलेल्या मुलाखती दरम्यानचा किस्सा ऐकून अंगावर काटे उभे राहतील.
अभिनेते पियुष मिश्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होत की, पियुष मिश्रा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते.
त्यांनी सांगितलं होत की, ते मुंबईत भाड्याच्या घरात राहत होते. भाड्याच्या घरात राहत असताना ते एके रात्री दारू पिऊन गेले असता त्यांची ती परिस्थिती पाहून त्यांच्या घरमालकाने त्यांना थेट घराबाहेर काढलं.
घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी थेट नाईलाजास्तव दादर रेल्वे स्टेशन गाठलं आणि तेथेच त्यांनी झोपण्याची सोय केली. त्यावेळी त्यांचा एक मित्रसुद्धा प्रचंड दारु पिऊन त्यांच्याजवळ आला होता.
पियुष मिश्रा जवळ आलेल्या त्यांच्या मित्राजवळ एक चादर होती. ते दोघेही चादर घेऊन स्टेशनवरच झोपी गेले. पीयूष यांनी ती चादर आपल्याही अंगावर पांघरुन घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिल असता पियुष मिश्रा यांचा तो मित्र मेला होता. रिपोर्ट्सनुसार जास्त दारु प्यायल्याने रात्री नशेतच त्याचा मृत्यू झाला होता. आणि अशाप्रकारे पीयूष यांनी आपल्या मित्राच्या मृतदेहासोबत नकळत रात्र काढली होती.