दमदार अभिनय, स्टायलिश अंदाज यासाठी ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘देऊळ बंद’,’सरसेनापती हंबीरराव’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय साकारत गश्मीरने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपट, मालिका यांसह गश्मीर सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो. नवीन रिल्स, फोटो पोस्ट करत गश्मीर चाहत्यांसह देखील अनेक गप्पा मारताना पाहायला मिळतो. गश्मीरने सोशल मीडियावरील ‘Ask Gash ‘ या प्रश्न उत्तरांच्या एका सेशनद्वारे प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांना रोकठोक उत्तरं दिली. या सेशन दरम्यान विचारलेल्या प्रश्ना दरम्यान गश्मीरने मनोरंजनसृष्टी बाबतची एक वास्तविकता बोलून दाखवली. (Gashmeer Mahajani About Marathi Films)
या प्रश्न उत्तरांदरम्यान गश्मीरला “साऊथ मनोरंजन सृष्टी सारखी मराठी मनोरंजन सृष्टीदेखील प्रगल्भ होऊ शकते का” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत गष्मीर म्हणाला “नक्कीच आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो हा पॅटर्न मोडीत काढलायला हवा”. गष्मीरने या उत्तरातून मराठी मनोरंजन विश्वात असणारा हा पायंडा मोडायला हवा असं स्पष्टपणे सांगितलेलं पाहायला मिळतंय. गष्मीरने या आधीही चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.
गश्मीरला लहानपणापासून डान्स व अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. २०१०च्या ‘मुस्कुराके देख जरा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचबरोबर त्याने हिंदी, मराठी क्षेत्रात बरेच चित्रपट केले. दरम्यान चाहत्यांमध्ये त्याच्या नवीन कामाविषयी उत्सुकता आहे. (Gashmeer Mahajani About Marathi Films)
देऊळबंद’, ‘कॅरी व मराठा, ‘कान्हा’, ‘धर्मवीर’ तसेच ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या चित्रपटात त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदीमधील ‘झलक दिखला जा’ या प्रसिद्ध डान्स कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचला. गश्मीर एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर तो उत्कृष्ट डान्सरही आहे. त्याची स्वतःची डान्स अकॅडमीही आहे.