माणसाला एखादा छंद असेल आणि तो छंद त्याची आवड झाली की मग तो आवडीची त्याच्याकडून रोज जपणूक केली जाते. गायक मंडळींच्या बाबतीत आपल्याला ही गोष्ट कायम पाहायला मिळते. एखाद्याला गाण्याचा छंद असेल तर तो त्याच्या छंदाला आवड बनवतो आणि त्यात सर्वोत्तम देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि सातत्यासाठी त्याच्याकडून रोज आपल्या कलेचा रियाज केला जातो. मराठी संगीत विश्वात अशी एक लोकप्रिय गायक जोडी आहे, जी सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे आणि ही जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे.
प्रथमेश-मुग्धा दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. दोघे त्यांच्या कार्यक्रमाविषयी तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधीतही काही अपडेट्स चाहत्यांना देत असतात. दोघे त्यांच्या गाण्याचे काही व्हिडीओदेखील चाहत्यांबरोबर शेअर करत असतात आणि त्या दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूपच आवडते. अशातच मुग्धा-प्रथमेश सध्या कोकणात आरवलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर ते त्यांची गायनसेवाही जोपासत आहेत.
मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुग्धा-प्रथमेश दोघेही भजनात दंग झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. घरच्या नित्य गुरुवार भजन सेवा निमित्त त्यांनी भजनात ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश भजन गाताना दिसत आहे तर मुग्धाही टाळ वाजवत भजन गात आहे. तसेच या व्हिडीओमध्ये मुग्धा-प्रथमेशच्या घरातील काही मंडळीदेखील देहभान हरपून भजनात दंग झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : कर्क ते कुंभपैकी कोणाचं नशिब आज उजळणार?, कोणाला मिळणार अधिक धन?, जाणून घ्या तुमचं भविष्य
दरम्यान, मुग्धा-प्रथमेश यांच्या गायनाचे अनेक चाहते आहेत. हे दोघेही देश-परदेशात त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम करत असतात. तसेच सोशल मीडियाद्वारेहीते त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच मुग्धाने शेअर केलेला व्हिडीओही चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओला चाहतेमंडळी चांगलाच प्रतिसाद देत आहेत.