मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पुरुष वाईट परिस्थितीमध्ये असेल तर…”, अमिताभ बच्चन यांच्या वाईट प्रसंगात जया बच्चन यांनी अशी दिली साथ, म्हणाल्या, “न रागावता…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 15, 2024 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
“पुरुष वाईट परिस्थितीमध्ये असेल तर...”, अमिताभ बच्चन यांच्या वाईट प्रसंगात जया बच्चन यांनी अशी दिली साथ, म्हणाल्या, “न रागावता...”

“पुरुष वाईट परिस्थितीमध्ये असेल तर...”, अमिताभ बच्चन यांच्या वाईट प्रसंगात जया बच्चन यांनी अशी दिली साथ, म्हणाल्या, “न रागावता...”

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या आपल्या रोखठोक विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेक गोष्टींवर त्या आपले मत परखडपणे मांडत असतात तसेच एखादी गोष्ट आवडली नाही तरीही त्याबद्दल स्पष्टपणे बोलतात. नुकतच त्यांना अनंत अंबानी व राधिक मर्चटच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात पाहिलं गेलं. त्यावेळी त्यांनी पापराझीना बघून स्मितहास्य केलं त्यामुळे अनेक मजेशीर चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. सध्या त्या नात नव्या नवेली नंदाच्या ‘व्हॉट द हेल’ या पॉडकास्टमुळे अधिक चर्चेत आल्या आहेत. (Jaya bachchan on Amitabh bachchan)

नव्याच्या पॉडकास्टमध्ये आजी जया बच्चन व आई श्वेता बच्चन यांनी हजेरी लावली होती. यामध्ये बच्चन कुटुंबाबद्दल अनेक खुलासे झाले. तसेच या शोमध्ये श्वेता व जया यांचे वादविवादही झाले. पण आता जया यांनी अमिताभ बच्चन यांच्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. जया यांनी अमिताब व त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल भाष्य केलं आहे. ९० च्या दशकामध्ये अमिताभ यांच्यावर खूप वाईट परिस्थिति आली होती आणि त्यावेळ जया त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. याबद्दल त्यांनी सविस्तरपणे पॉडकास्टमध्ये सांगितली आहे.

आणखी वाचा – लेकीसह भारतात परतली प्रियांका चोप्रा, दिसते इतकी सुंदर की सगळेच पाहत बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन एकदा बोफोर्स घोटाळ्यामध्ये अडकले होते. त्यांना मध्यामातूनही बंदी घालण्यात आली होती. तसेच अनेक वर्षापर्यंत त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर मात्र ते कर्जबाजारीही झाले होते. त्यावेळीच जया यांनी अमिताभ यांची खूप साथ दिली.

आणखी वाचा – “मी त्यांच्यासारखी नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जया बच्चन यांना टोमणा, म्हणाल्या “मी त्यांच्यापेक्षा खूप…”

त्या म्हणाल्या की, “आम्ही आमच्या आयुष्यात खूप वाईट परिस्थितिमधून गेलो. पण आम्ही न घाबरता एकत्रितपणे या सगळ्याचा सामना केला. मला नाही माहीत मी बरोबर केलं की चूक केलं. पण जेव्हा एखादा पुरुष वाईट परिस्थितिमधून जात असेल तर त्यावेळी आपण न रागावता, आततायीपणा न करता गप्प राहिलेलं बरं असतं. जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते मदत मागतील. पण त्यांच्यावर रागावणे हे त्यांच्यासाठी अधिक त्रासदायक असते. त्यामुळे गप्प राहणे आणि आपण बरोबर आहोत असं सांगणे हे अधिक दिलासादायक असते”.

पण जया यांच्या या मतावर श्वेताने असहमत असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, “मला असं वाटतं की पुरुष अधिक समस्यांना सामोरे जात असतात. जर तुमचा कोणी मित्र संकटात असेल तर आणि त्याने तुमच्याकडे मदत मागितली नाही तर तुम्ही मदत करणार नाही का? , मी तर करेन. जर तुम्ही मुलीसाठी असं करु शकत असाल तर मुलासाठी का नाही? कधी कधी पुरुषाला फक्त तुमची एक हाक हवी असते. तसेच तुम्ही जर एखादी त्याला कल्पना दिली तर त्यावर काम करुन कदाचित तो त्या समस्येमधून बाहेर येऊ शकेल. मला मदत करायला आवडले. मला त्याची समस्या सोडवायला आवडेल.

अशा अनेक मुद्यांवर चर्चा झालेल्या पाहायला मिळाल्या. जया नुकत्याच रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटामध्ये दिसून आल्या होत्या.

Tags: amitabh bachchanjaya bachchannavya naveli podcastShweta bachchan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Next Post
Gashmeer Mahajani About Marathi Films

"आपणच आपले पाय ओढतो" मराठी मनोरंजनसृष्टीबाबत गश्मीर महाजनीचं मोठं विधान, म्हणाला, "हा पॅटर्न मोडीत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.