ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर विविध चर्चांना तोंड फुटलं. जुलै महिन्यामध्ये पुण्यामधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यामध्ये ते एकटेच राहत होते. दोन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली. यानंतर महाजनी कुटुंबियांना अनेक प्रश्नांना सामोर जावं लागलं. रविंद्र महाजनी यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनीला तर ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. पण त्याने प्रत्येक प्रश्नांना अगदी चोख उत्तर दिलं आहे.
गश्मीर सध्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी अधिकाधिक संवाद साधताना दिसतो. त्याने आतापर्यंत वडिलांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अगदी चोख उत्तरं दिली. आताही त्याने इन्स्टाग्रामद्वारे एक सेशन ठेवलं होतं. ‘Ask Gash’ या सेशनद्वारे त्याने चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. यावेळी एका चाहत्याने गश्मीरला वडिलांबाबत प्रश्न विचारला.
आणखी वाचा – जिनिलीया तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, “मला अजून २-३ मुलं पाहिजे पण…”
“वडिलांचं निधन झाल्यानंतर केस कापतात. यावर तुमचं मत काय? मला तुमचं मत ऐकायला आवडेल”. असा प्रश्न एका चाहत्याने विचारताच गश्मीरने त्याला उत्तर दिलं. गश्मीर म्हणाला, “मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थार्जन होते. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?”.
आणखी वाचा – “बाळा तुला…”, बायकोच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, खास गिफ्टही दिलं अन्…
गश्मीरने वडिलांचं निधन झाल्यानंतर केस का कापले नाहीत? याचं अगदी सडेतोड उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराने सगळ्यांचीच बोलती बंद केली. सध्या गश्मीर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या तयारीला लागला आहे. त्याचबरोबरीने तो कुटुंबियांसह त्याच्या आईचीही उत्तम काळजी घेताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत वडिलांबाबत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत सगळ्यांची बोलती बंद केली आहे.