शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अवॉर्ड्स विकले जातात का?”, सिद्धार्थ चांदेकरचं बेधडक वक्तव्य, म्हणाला, “तू फेव्हरेट असशील तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 11, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Chandekar On Awards

“अवॉर्ड्स विकले जातात का?”, सिद्धार्थ चांदेकरचं बेधडक वक्तव्य, म्हणाला, "तू फेव्हरेट असशील तर..."

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एका विशेष कारणामुळे सध्या चर्चेत आला आहे. आजवर सिद्धार्थने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मिडियावरही सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच सिद्धार्थने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतील पुरस्कारांवरुन केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. सिद्धार्थने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलखात दिली. यावेळी बोलताना सिद्धार्थने अवॉर्ड्स विकले जातात का?, यावर भाष्य केलं. (Siddharth Chandekar On Awards)

“अवॉर्ड्स विकले जातात का?” असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला. यावर उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला, “आपल्याकडे तरी मला नाही वाटत की, पुरस्कार विकले जात असतील. आपण त्या लेव्हलला अजूनतरी नाही पोहोचलो आहोत आणि माझी इच्छा आहे की ती वेळ कधीच येऊ नये. मला या गोष्टी पटत नाही. मला सत्य परिस्थिती माहिती नाही. पण, अवार्ड्स निश्चितपणे विकले जात नाही”.

आणखी वाचा – “बोलताना भान ठेवा”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपमान करताच गौरव मोरे भडकला, दम देत म्हणाला, “हे एक प्रतिष्ठित नाव…”

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

“अवार्ड्स विकले जात नाहीत पण, पक्षपात केला जातो हे मला नक्की माहिती आहे. जर का तुम्ही त्यावेळचे फेव्हरेट असाल तर तुम्ही काय काम केलं आहे हे पाहिलं जात नाही. अलीकडच्या काळात पुरस्कार सोहळ्याचं स्वरुप हुकलेलं आहे आणि ही गोष्ट आता प्रेक्षकांसह कलाकारांना सुद्धा माहिती आहे. याआधी जे अवॉर्ड फंक्शन व्हायचे…ते कार्यक्रम खूपच भारी असायचे. टीव्हीसमोर बसून असे सोहळे पाहावेसे वाटायचे किंवा नॉमिनेशन जाहीर झाल्यावर आपल्या मनात उत्सुकता निर्माण व्हायची. पण, आता ती उत्सुकता नाहीशी झाली आहे. आत प्रेक्षकांना माहित असतं की हा फेव्हरेट आहे आणि यालाच पुरस्कार देणार. पुरस्कार सोहळ्यांमधला सरप्राईज एलिमेंट आता हरवला आहे”, असं सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं.

आणखी वाचा – संजनाने अरुंधतीला काढलं घराबाहेर?, दोघींमध्ये वाद, अनिरुद्ध नेमकी कोणाची घेणार बाजू?, मालिकेत रंजक वळण

“पक्षपातीपणा कोणामुळे होतो?” यावर सांगताना सिद्धार्थ म्हणाला, “पक्षपात हा एका गोष्टीपासून सुरु न होता तो एका माणसापासून सुरु होतो. जर या लोकांचा तू फेव्हरेट असशील तर, त्यांनी नियोजन केलेल्या सगळ्या कार्यक्रमांचा, त्या प्रेक्षकांचा तू फेव्हरेट राहणार. त्यामुळे पक्षपात होण्याची अनेक कारणं आहेत. मला माहिती आहे की एकेकाळी मी सुद्धा फेव्हरेट होऊन गेलो आहे आणि एकेकाळी मी नावडताही झालो आहे. जेव्हा मी फेव्हरेट होतो तेव्हा माझी एवढी काही काम लोकांपर्यंत पोहोचली नाहीत आणि जेव्हा मी इतर लोकांचा फेव्हरेट नव्हतो तेव्हा माझी चांगली काम बाहेर आली”. सिद्दार्थ पुढे म्हणाला, “परीक्षकसुद्धा निवडले जातात तेव्हा ते कोणाचे तरी आवडते आहेत म्हणून निवडले जातात. तीन परीक्षक विजेता ठरवतात. हे सगळे मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. वोट करुन विजेता सिलेक्ट करणं यावर माझा अजिबात विश्वास नाही. याउलट जर एक मोठं पॅनेल असेल जिथे सगळ्या क्षेत्रातील लोकांनी चर्चा करुन विजेता ठरवलं पाहिजे. वोटिंग या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही”.

Tags: marathi actorsiddharth chandekarsiddharth chandekar awards functionSiddharth Chandekar On Awards
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
kareena kapoor court case

धर्माचा अपमान अन्…; करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल, १ जुलैला होणार सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.