‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कानामागून आली’ व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक या विनोदी शोमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. अंशुमनने अनेक विनोदी कार्यक्रमांबरोबर ‘शिनमा’, ‘पोस्टर बॉयज’सारख्या अनेक चित्रपटांतदेखील काम केले आहे. तसेच अभिनेता सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या शोमध्येही सहभागी झाला होता.
अंशूमनने महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात त्याने विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले होते. मात्र अभिनेत्याने काही काळापूर्वीच या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतला. एकसारखेच काम करुन कंटाळलो असल्यामुळे त्याने या विनोदी कार्यक्रमातून ब्रेक घेत असल्याचे म्हटले होते. मात्र अंशूमनचे अनेक चाहते पुन्हा त्याला या शोममध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते याबद्दल विचारणाही करतात. अशातच त्याने याबद्दल आपले मत मांडले आहे.

अभिनय, गायनसारख्या कलांमध्ये रमणारा अंशुमन सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय असतो. आपले अनेक फोटो व लेकीबरोबरचे विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे त्याला त्याच्या त्याचे अनेक चाहते मंडळी त्याच्या कामाबद्दल सोशल मीडियाद्वारे प्रश्न विचारत असतात. असंच एका व्हिडीओखाली एका चाहत्याने अंशुमनला “महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुन्हा का नाही येत?” असा प्रश्न विचारला आहे.
याबद्दल अंशुमनने या चाहत्याला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “आयुष्यात सतत नवीन करण्याचा प्रयत्न करावा या मताचा मी आहे. त्यामुळे एके ठिकाणी निवडक काम करणं मला जमत नाही.” दरम्यान अंशुमनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो सध्या रंगभूमीवर ‘राजू बन गया zentelman’ व ‘वस्त्रहरण’ या नाटकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.