‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच बराच चर्चेत होता. प्रभासने साकारलेल्या भूमिकेवर तसेच या चित्रपटावरही बरेच आक्षेप घेण्यात आले होते. चित्रपटात झालेलं प्रभू श्रीराम यांचं वाईट चित्रीकरण, रामायणासारख्या महाकाव्याशी केलेली छेडछाड तसंच खराब व्हीएफएक्स, आक्षेपाहर्य संवाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. दिग्दर्शक, लेखकांबरोबरच प्रभू श्रीरामाची भूमिका साकरणाऱ्या प्रभासवरही बरीच टीका झाली होती. (Prabhas play role of bhagavan Shankar)
आता अभिनेता प्रभास नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कल्की २८९८एडी’ आणि ‘सालार’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. प्रभासच्या नवीन चित्रपटांची चाहते बरीच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. जरी त्याचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरीही त्याच्या येत्या चित्रपटांबाबत लोकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. त्यातच आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘कन्नप्पा-ए ट्रू एपिक इंडियन टेल’ असं या चित्रपटाचं नाव आहे. मुकेश कुमार सिंह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मुकेश हे ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात.
❤️ Har Har Mahadev ❤️ #Kannappa ???? https://t.co/GXbSbayFrX
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) September 10, 2023
या चित्रपटात प्रभास भगवान शंकराची भूमिका साकरताना दिसणार आहे. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. ‘आदिपुरुष’मध्ये त्याने साकारलेल्या भगवान रामाच्या भूमिकेवर बऱ्याच टीका करण्यात आल्या होत्या. आता या चित्रपटात त्याची भूमिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडते हे पाहणे रंजक ठरणार आहे.प्रभासबरोबर या चित्रपटात तेलुगू स्टार विष्णू मंचूही दिसणार आहे. तसेच अभिनेत्री क्रिती सेनेनची बहिण नुपुर सेनेनही या चित्रपटात दिसणार आहे. ट्रेड एनालिस्ट व फिल्म क्रिटिक मनोबाल वी आणि रमेश बाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. प्रभास व विष्णू मंचूचा एकत्र फोटो शेअर करत रमेश बाला यांनी लिहिलं, “स्टार प्रभास व अभिनेता विष्णू मंचूच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘कन्नप्पा – ए ट्रू एपिक इंडियन टेल’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे”.
विष्णू मंचू यांनी रमेश बाला यांची पोस्ट पुन्हा शेअर करत बातमीची पुष्टी केली आहे. “हर हर महादेव, कन्नप्पा” असे त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिलं आहे. प्रभासने यापुर्वी देवांच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटात भगवान रामाची तर ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात त्याची भगवान विष्णूच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे. सध्या प्रभास ‘केजीएफ’ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली असलेल्या ‘सालार’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘कल्की २८२९ एडी’ या चित्रपटामध्येही तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासह अभिनेत्री दिपिका पदुकोण, अभिनेता अमिताभ बच्चन, कमल हसन व राणा दग्गुबती हे कलाकारही दिसणार आहेत.