सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधणं सोपं झालं आहे. मध्यंतरी अशीच एक घटना घडली. ‘पबजी’ खेळामुळे खुललेली एक प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरली. पाकिस्तानातून आलेली सीमा व भारतातील सचिन यांची ही प्रेमकथा. सीमा ऑनलाइन गेम ‘पबजी’ खेळताना भारतातील सचिनच्या प्रेमात पडली. एवढंच नाही तर ती या प्रेमापोटी स्वतःच्या नवऱ्याला सोडून नेपाळमार्गे भारतात आली. ती येताना एकटी आली नाही तर तिच्याबरोबर ती स्वतःच्या चार मुलांनाही घेऊन आली. ही प्रेमाची अजब कहाणी सगळीकडे गजब गाजली. या प्रेमकहाणीच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. ती आतंकवादी असल्याचंही म्हटलं जात होतं. हे गजबजलेलं प्रकरण लवकरच चित्रपट रुपात सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.(First Poster Of Movie On Seema Sachin Love Story)
सीमा व सचिन या दोघांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर बरीच गाजली. पण लवकरच चित्रपटाच्या रूपाने सगळ्यांना ती पाहता येणार आहे. या प्रकरणावर चित्रपट बनेल याची सगळ्यांनाच खात्री होती. पण तो एवढ्या लवकर प्रेक्षकांच्या भेटील येईल याची कल्पना कोणीही केली नव्हती. नुकतंच चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून या चित्रपटाचं पहिलं गाणं २० ऑगस्टला प्रदर्शित झालं आहे.
वाचा – काय आहे चित्रपटाचं नाव? (First Poster Of Movie On Seema Sachin Love Story)
या चित्रपटाची निर्मिती अमित जानी यांनी केली. तर दिग्दर्शन भरत सिंह यांनी केलं आहे. या चित्रपटात सीमाची भूमिका अभिनेत्री फरहीन फलक निभावणार असल्याचं बोललं जात आहे. आताच निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत ही माहिती दिली. त्यात त्यांनी चित्रपटाच्या गाण्याबद्दलही माहिती दिली.
सीमा व सचिनची प्रेमकथा पबजी खेळापासून सुरू झाली. हा गेम खेळत असताना या दोघांची ओळख झाली. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे सीमा विवाहित असून तिला चार मुलं आहेत. त्याची खेळामुळे जवळीक एवढी वाढली की ते दोघे तासनतास फोनवर बोलू लागले. काही दिवस हे प्रकरण बरंच गाजलं होतं. यापुढेही सीमा चर्चेत राहणार आहे. सीमा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असून एका चित्रपटात सीमाला काम मिळणार असल्याचं बोललं जात आहे. शिवाय मनसेचा या चित्रपटाला विरोध आहे. तरीही ‘कराची टू नोएडा’ आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.