बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अखेर प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावच्या ‘त्या’ कृतीचा बदला घेतलाच, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “बदला घेतला पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 28, 2024 | 6:18 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Khandekar taken revenge on Namrata Sambherao by sharing a funny video

Video : अखेर प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावच्या ‘त्या’ कृतीचा बदला घेतलाच, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “बदला घेतला पण...”

सोशल मीडियावर अनेक कलाकार मंडळी आपल्या आवडत्या कलाकारांबरोबरची धमाल, मजामस्ती शेअर करत असतात. सोशल मीडियावरील कलाकारांची ही धमाल मजामस्ती चाहत्यांनादेखील तितकीच आवडते. काही दिवसांपूर्वी नम्रता संभेरावने सहकलाकार व तिचा मित्र प्रसाद खांडेकरबरोबर मजामस्तीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये प्रसाद झोपेत पेंगतानाचे पाहायला मिळाले होते. नम्रताने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियाद्वारे शेअर केला होता.

या व्हिडीओमध्ये प्रसाद पेंगताना दिसत होता. “सॉरी, कँट्रोल नाही झालं पश्या. हा ऑडिओ खूप ट्रेंडमध्ये आहे, म्हणून मी ही पोस्ट करत आहे (btw हा व्हिडिओ jet lag मधला होता. आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, तेव्हाचा आहे) बाकी पश्याला आळस येत नाही, तो खूप उत्साही आहे. माझं काही खरं नाही” असं लिहित नम्रताने प्रसादचा हा गंमतीदार व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर प्रसादने “रुको नम्रता. “इसका करारा जवाब मिलेगा. सबका बदला लैगा रे पश्या” अशी प्रतिक्रिया दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

आणखी वाचा – दुकानावर स्वत:चा फोटो पाहून भारावला ‘हा’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “अनेक हिरोंचे फोटो…”

आणि अखेर प्रसादने त्याचा हा बदला घेतलेला आहे. प्रसादनेही नम्रता झोपलेली असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “काही दिवसांपूर्वी नम्रताने माझा एक व्हिडीओ शेअर केला होता. आता तुम्हीदेखील तिला झोपताना बघा. किती क्यूट दिसते बघा. हा आळस नसून प्रमोशनसाठी सध्या धावपळ सुरू आहे. आता मी एका वेगळ्या प्रकारे तिला झोपेतून जागा करतो आहे.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी, अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप, म्हणाली, “अशा मानसिकतेला….”

त्यानंतर प्रसाद ‘नाच गं घुमा’ हे गाणं लावतो. हे गाणं ऐकून नम्रता दचकून झोपेतून उठते. सुरुवातीला ती थोडी घाबरते, पण नंतर ‘नाच गं घुमा’ची हूक स्टेप करतानाचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, स्वतः नम्रता संभेराव, भक्ती रत्नपारखी या कलाकारांसह चाहते मंडळींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: marathi entertainment newsnamrata sambheraoprasad khandekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
29 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

साध्य व रवि योग यांच्या संयोगाने उद्या ‘या’ ५ राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश, तर बाकी राशींसाठी कसा असेल दिवस?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.