बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही अशोक मामा इतके फिट कसे?, त्याक्षणी व्यायाम करणंही सोडून दिलं अन्…; म्हणालेले, “झिरो फिगर किंवा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 21, 2023 | 6:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ashok Saraf On Fitness

वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही अशोक मामा इतके फिट कसे?, त्याक्षणी व्यायाम करणंही सोडून दिलं अन्…; म्हणालेले, "झिरो फिगर किंवा…"

कलाकारांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे त्यांच्या फिटनेसकडे साऱ्यांचं आधी लक्ष जातं. कलाकार मंडळी हे स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. प्रत्येकाची फिटनेसबद्दलची व्याख्या ही निराळी असते. एव्हरग्रीन अभिनेते अशोक सराफ यांचीही फिटनेसची व्याख्या निराळी आहे. अशोक सराफ यांनी चक्क व्यायाम करणंच सोडून दिलं होत, याबाबत त्यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं होत, काय आहे हा किस्सा हे जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Ashok Saraf On Fitness)

व्यायाम करणं ही प्रत्येक कलाकारांची जमेची बाजू आहे. मात्र याला अपवाद ठरत अशोक मामांनी थेट व्यायाम करणंच सोडून दिलं होत. व्यायामाबद्दल अशोक मामाचं नेमकं काय म्हणणं होत. झिरो फिगर, सिक्स पॅक यांसारख्या गोष्टींवर मामांची वैयक्तिक अशी मत होती. याबाबत बोलताना त्यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.

पाहा अशोक मामांनी का सोडलं होत व्यायाम करणं (Ashok Saraf On Fitness)

झिरो फिगर, सिक्स पॅकबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले की, “झिरो फिगर, सिक्स पॅक याची मला कधी गरजच पडली नाही. लहानपणी मी व्यायामशाळेत जात होतो. त्यावेळी एक वेडा विचार माझ्या डोक्यात आला, आणि तो वेडा विचार आहे, हे आता खरंतर जाणवतंय. मी स्टेजवर काम करताना एकदम इलेक्ट्रोफाईड ऍक्शन करतो, आणि व्यायाम करून समजा माझ्यातली लवचिकता निघून जाईल असं मला सारखं वाटायचं. म्हणून मी व्यायाम करायचं सोडून दिलं”.

हे देखील वाचा – “लक्ष्मीकांत गेल्यानंतर मला…”, ‘तो’ प्रसंग सांगताना प्रिया बेर्डेंना रडू कोसळलं, म्हणाल्या, “आई-वडिलांचंही निधन झालं अन्…”

“कुठल्याही परिस्थितीत मी व्यायाम करायचं टाळू लागलो. कारण मला सहजपणे हलता यावं. आणि माझ्या फिटनेसचं रहस्यही हेच वावरणं आहे. तुम्ही किती ऍक्टिव्ह राहता हेच फिट्सनेसचं रहस्य आहे. स्टेजवर काम करताना खूप वावरणं हे होतच. बरेचदा प्रेक्षक येऊन विचारतात की, ‘एवढी एनर्जी कुठून आणता तुम्ही’?

हे देखील वाचा – “प्रेमावरचा विश्वास…”, घटस्फोटानंतर मानसी नाईक दुसरं लग्न करण्यास तयार? म्हणाली, “बायको म्हणून मला…”

आजवर अशोक सराफ यांनी कित्येक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, आजही त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतं. मात्र आजवर काम करताना व्यायाम व्यायामशाळेत जाऊन केला नाही, म्हणून कोणत्याच अडचणींना मामांना सामोरं जावं लागलं नाही.

Tags: ashok sarafashok saraf fitnessentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Next Post
Sankarshan Karhade Singapore Tour with Family

धमाल-मस्ती, चेहऱ्यावरील आनंद अन्…; संकर्षण कऱ्हाडेच्या मुलांचा पहिला परदेश दौरा, अभिनेता व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.