टेलिव्हिजनवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहू ही भूमिका अधिक लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र आता ती कोणत्याही भूमिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. देवोलीना लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने घरी नवीन पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अभिनेत्री व तिच्या पतीने त्यांचे फोटोदेखील शेअर केले होते. त्यांच्या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली होती. अशातच आता तिच्या नवीन मॅटर्निटी फोटोशूटने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (devoleena bhattacharjee matrnity photoshoot)
देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये ती पती शहनवाजबरोबर डिसीन येत आहे. तसेच त्यांच्यामध्ये एक रोमॅंटिक अंदाजदेखील पाहायला मिळत आहे. यामध्ये त्यांचा लाडका पाळीव श्वान एंजलदेखील आहे. देवोलीनाने क्रीम रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या हातात लीलीची फुलं दिसून येत आहेत. हे सगळे फोटो शेअर करत देवोलिनाने लिहिले की, “पालक म्हणून आमचा एक नवीन प्रवास सुरु होत आहे. या सगळ्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत”.
तिचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच काहीनी प्रतिक्रियादेखील दर्शवली आहे. एकाने प्रतिक्रिया दिली की, “कोणाची नजर ना लागो”, तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “देवोलीना खूप सुंदर दिसत आहे”, तसेच नेटकऱ्यांशिवाय तिच्या मित्रमैत्रीणिंनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.
देवोलीनाचा नुकताच डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. ती खूपच सुंदर दिसत होती. देवोलीना शहनवाजबरोबर २०२२ साली लग्नबंधनात अडकली. नुकतीच ती ‘छटी मय्या’ या मालिकेत दिसून आली होती. मात्र गरोदरपणामुळे तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.