टेलिव्हीजन अभिनेत्री व राजकीय नेत्या स्मृति इराणी सध्या राजकारणामुळे अधिक चर्चेत आल्या आहेत. मात्र राजकारणामध्ये येण्यापूर्वी त्या एक यशस्वी टेलिव्हीजन अभिनेत्री राहिलेल्या आहेत. ‘क्युकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील तुलसी ही भूमिका इतके वर्ष झाले तरीही अजून प्रेक्षकांच्या लक्षात आहे. एक आदर्श सून म्हणून त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. सध्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्री म्हणून सक्रिय आहेत. त्यांनी आजवर राजकरणात खूप मोलाचे योगदान दिले आहे. अशातच आता त्यांच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर येत आहे. आता त्या पुन्हा एका कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. (smriti irani in tv serial)
टेलिव्हीजनवर सध्या ‘अनुपमा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहे. या मालिकेमध्ये १५ वर्षांचा लिप दाखवण्यात आला आहे. यामध्ये अनेक कलाकारांनी मालिकेला राम-राम केला. यानंतर स्मृति आता या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्मृति आता ‘अनुपमा’ मालिकेत रुपालीबरोबर स्पेशल कॅमियो करणार आहे. त्यांना याआधी २००९ साली ‘मणीबेन डॉट कॉम’ मध्ये बघितले गेले होते. त्यानंतर त्यांनी ‘अमृता’ या बंगाली चित्रपटामध्येदेखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. २००३ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथून त्यांच्या राजकीय करकीर्दीची सुरुवात झाली. ‘अनुपमा’ मालिकेत आराध्याची भूमिका याआधी औरा भटनागरने साकारले होते. आता ही भूमिका अलीशा परविन साकारत आहे.
‘अनुपमा’ या मालिकेचे दिग्दर्शन रंजन शाहीने केले आहे. हा कार्यक्रम २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच स्मृति यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्या ‘विरुद्ध’, ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘कविता’ व ‘थोडीसी जमीन थोडासा आसमान’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.