Appi Aamchi Collector : छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली काही वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अप्पी, अर्जुन व सिंबा यांच्यासह प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात घर करून गेलं आहे. त्यामुळे हे प्रत्येक पात्र दर्शकांना आपलसं वाटतं. मालिकेतील अप्पी या पात्राला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तिची भूमिका व तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडत असून तिच्या अभिनयाचे कौतूक होत असतं. मात्र नुकतंच तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागत आहे. (Appi Aamchi Collector)
झी मराठीच्या इन्स्टग्राम अकाऊंटद्वारे एक ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर तारुण्यपिटिका (Pimples) आहेत. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर कलाकारांना चाहत्यांकडून जितकं प्रेम मिळत, तितकचं त्यांना ट्रोलदेखील केलं जातं. असंच काहीसं अप्पीबरोबर होत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी “शूटिंगमुळे चेहरा खराब होत आहे अपर्णा”, “खूप पिंपल्स आलेत काळजी घ्या”, “चेहऱ्यावर किती पिंपल्स आलेत”. अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच काहींनी तिला पिंपल्स येऊ नयेत याबद्दल सूचनाही दिल्या आहेत. व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मालिकेत सिंबाला कोणता तरी गंभीर आजार झाला असून याबद्दल त्याला स्वत:लाच माहिती पडल्यामुळे तो आता यातून कसा बाहेर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मालिकेत याआधी अमोल देवासमोर हात जोडून प्रार्थना करत “मला काही झालं तरी चालेल. पण माझ्या माँ आणि बाबांना एकत्र आण” असं म्हटला होता. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अर्जुन अप्पीला म्हणतो की आपण फक्त अमोलसाठी एकत्र राहायचं. इथून पुढे आपल्यात नवरा-बायकोचं नातं नसेल. ही गोष्ट अमोलला चुकूनही कळाली नाही पाहिजे. मात्र ही गोष्ट अमोल ऐकतो आणि तो बेशुद्ध पडतो.