Paaru Marathi Serial Update : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत खूप मोठं रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत दिशाचा खरा चेहरा सर्वांसमोर आला असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी दिशानेही पारू, आदित्य, प्रीतम यांनी अहिल्यादेवींपासून लपवलेलं सत्य समोर आणलं. यामुळे अहिल्यादेवी तिघांवर नाराज झाल्या. तर त्यांनी दिशाच्या कानाखाली मारत तिला तिच्या आई-वडिलांसह पोलिसांच्या ताब्यात दिले. दिशाला पोलीस जेलमध्ये घेऊन गेले त्यानंतर अहिल्यादेवींनी पारू, आदित्य व प्रीतम यांच्याशी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला. श्रीकांतने सांगूनही अहिल्यादेवी त्यांच्या मतावर ठाम होत्या. शिवाय त्यांनी त्यांना माफ न करण्याचेही मनाशी ठरवले.
या सगळ्या प्रकारादरम्यान प्रिया अहिल्यादेवींची माफी मागायला आलेली असते. मोहनला सांगून त्या प्रियाला तिच्या गावी पाठवायला सांगतात. त्याचवेळेला सयाजीराव किर्लोस्कर मेन्शनमध्ये येतात. अहिल्या रागावून जात असताना ते आवाज देत, “मलासुद्धा माफ करणार नाहीस का?”, असं विचारतात. तो ओळखीचा आवाज ऐकून अहिल्यादेवी मागे फिरतात. आणि पाहतात तर आबासाहेब दरवाज्यात उभे असतात. त्यांना तब्बल २० वर्षांनी समोर पाहून अहिल्यादेवींनी रडू कोसळतं. ही अनपेक्षित भेट त्यांच्या डोळ्यातून बरंच काही सांगून जाते.
त्यानंतर आबासाहेब अहिल्यादेवींची हात जोडून माफी मागतात. “मी तुला ओळखायला चुकलो”, असं म्हणत ते माफी मागतात. तर अहिल्या त्यांच्या पायाला धरुन त्यांची माफी मागते. यानंतर आबासाहेब हे सारं पारूमुळे शक्य झालं असं सांगतात. तर इकडे आबासाहेब प्रिया ही त्यांची लेक असल्याचं सांगतात. इतकंच नव्हे तर अहिल्यादेवींसमोर ते प्रीतम व आदित्यच कौतुक करतात. आणि तुझी मुलं कधीच चुकणार नाही असंही सांगतात. शिवाय पारूवर कधीच शंका घेऊ नको असंही ते सर्वांसमोर बोलतात. तसेच प्रियाचा सांभाळ करशील का?, असंही अहिल्या देवींना विचारतात.
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अखेर प्रिया व प्रीतम यांचे नाते मान्य करुन त्यांचं लग्न होतं आहे. आबासाहेब प्रियाचा हात प्रीतमच्या हातात देतात आणि त्याच मांडवात दोघांचं लग्न होतं. यावेळी प्रीतमसह संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब आनंदी असलेलं पाहायला मिळतंय.