शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाना पाटेकर प्रकरणाला पुन्हा नवीन वळण, माजी आय.ए.एस. अधिकाऱ्याने दिली थेट धमकी, म्हणाला,”पुढच्या वेळी उत्तर प्रदेशात याल तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 23, 2023 | 7:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ex ias officer threatened to marathi actor nana patekar through twitter video

नाना पाटेकर प्रकरणाला पुन्हा नवीन वळण, माजी आय.ए.एस. अधिकाऱ्याने दिली थेट धमकी, म्हणाला,"पुढच्या वेळी उत्तर प्रदेशात याल तर..."

अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांतून विविध भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे नाना गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी नानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नानांनी वाराणसीमध्ये शूटिंग करत असताना सेल्फी घ्यायला आलेल्या एका मुलाला डोक्यात मारलं होतं. यावरून सोशल मीडियासह अनेक माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.

या प्रकारामुळे नानांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर त्यांना अनेक नेटकरी व चाहत्यांची नाराजीही पत्करावी लागली होती. अर्थात या प्रकरणानंतर नानांनी एक व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली होती. मात्र या प्रकरणाला पुन्हा एकदा एक नवीन वळण आलं आहे. माजी आय.ए.एस. अधिकारी अभिषेक सिंगने नानांना धमकी दिली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IAS Abhishek Singh ने नाना पाटेकर को दिया उत्तम जवाब … #abhisheksingh #nanapatekar #UttarPradesh #Varanasi pic.twitter.com/uFPBCyjTR2

— Abhishek Dubey (@AbhishekDube000) November 23, 2023

आणखी वाचा – Video : बहुचर्चित ‘डंकी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित, गाण्यातील शाहरुख खान व तापसी पन्नूच्या केमेस्ट्रीने वेधलं लक्ष

अभिषेकने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी मी नानांविरुद्ध तक्रार केली असल्याचे सांगितले. पण मी अद्याप असं काही केलेलं नाही. जेव्हा तुम्ही उत्तर प्रदेशात येता. तेव्हा आमचं सरकार तुम्हाला सबसिडी देतं. उत्तर प्रदेशातील लोक तुम्हाला सन्मान देतात. तुमचं आदरातिथ्य करतात. पण त्याबदल्यात तुम्ही आम्हाला कानाखाली मारता? हे कुणालाही आवडणार नाही. आमचं सगळंच उत्तम आहे. ज्याप्रमाणे आमचा सन्मान, स्वागत उत्तम आहे. तसाच आमचा मारदेखील उत्तम आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या लोकांना उत्तरही चांगलंच देता येतं. त्यामुळे पुढच्या वेळी याल तेव्हा नीट या.”

आणखी वाचा – “प्रेम, जबरदस्त ऍक्शन, हाणामारी अन्…” रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या ट्रेलरने घातलाय धुडगूस, पण भाव खाऊन गेली बॉबी देओलची भूमिका

दरम्यान नाना पाटेकर यांनी जेव्हा त्या तरुणाला मारलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी एका पत्रकार परिषदेत माजी अधिकारी अभिषेकने हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा अभिषेकने या व्हिडीओद्वारे त्याचे मत मांडले आहे. त्यामुळे आता या व्हिडीओला नाना काय उत्तर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi newsnana patekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
bigg boss 17 vicky jain gets angry on sana raees khan over housework in the new promo

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा एकदा राडा, विकी जैन व सना खान यांच्यात कडाक्याचं भांडण, म्हणाला, "मी तुला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.