कलाकार मंडळी ही आपल्या करिअरसाठी, पॅशनसाठी आणि मुख्यत्वे मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना दूर ठेवून शूटिंगसाठी जात असतात. मात्र आईच बापाचं काळीज असल्याने ते त्यांच्या मुलांभोवतीच फिरत असतं. कितीही शूटिंगमध्ये व्यस्त असलं तरी प्र्त्ये आई बापाला आपल्या बाळाची हुरहूर लागून राहिलेली असते. (Dhanashri Kadgaonkar Emotional post)
विशेष म्हणते त्यात ते बाळ लहान असेल तर आणखीनच. अशीच लेकाला पुण्यात सोडून मुंबईत शूटिंगसाठी आलेल्या अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केली आहे, या व्हिडिओमध्ये तिचा लेक कबीर धनश्रीला तिच्या मालिकेतील शिल्पी या नावाने हाक मारताना दिसतोय.
पाहा धनश्रीची लेकासाठीची खास पोस्ट (Dhanashri Kadgaonkar Emotional post)
या व्हिडिओसोबाबत धनश्रीने भावुक कॅप्शन देखील लिहिलंय, कबीर फक्त दीड वर्षांचा होता जेव्हा मी त्याला सोडून काम करायला सुरुवात केली. पुणे सोडून मुंबईत आले. लगेच त्याला इथे आणणं शक्य नव्हतं. त्याचं vaccination, doctors सगळं पुण्यात होतं. असं वाटलं खूप मोठी चूक झाली माझ्या कडून किंवा घाई केली का मी, थोडं थांबायला हवं होतं. निदान तो बोलू लागे पर्यंत तरी, तो मला विसरून जाईल का असंही वाटलं होतं.
पण ती एक phase असते, ती पास झाली की गोष्टी होतात सगळ्या नीट, खरंतर अजून कबीर ने सिरीयल बघितली पण नाहीय्ये. मुळात त्याला Tv चं अजून introduce केला नाहीये आम्ही. त्याला फक्त इतकच माहितीये की आई शूटिंग करते, मेकअप करते. मी नाही आहे म्हणून त्याने आज पर्यंत कधीचं असा खूप गोंधळ घातला नाही (या गोष्टीचं बरं ही वाटतं पण तितकंच वाईट पण वाटतं . सगळ्या new working moms सहमत असतील याला ) अजून तरी कबीर छान सपोर्ट करतोय, पुढचं माहित नाही, या सगळ्यात दुर्वेश आई आणि बाबा असं दोन्ही बनून गेला.(Dhanashri Kadgaonkar Emotional post)
हे देखील वाचा – ‘रात्री १ वाजल्यापासून रांगेत…’ म्हणत अमृताने शेअर केला आईसोबत उज्जैन दर्शनचा अनुभव
त्याला एके दिवशी सांगितलं की मी शिल्पी नावाचं character करते, तेव्हा तो शब्द कदाचित त्याला खूप आवडला आणि त्या नावात, त्या शब्दात त्याला काहीतरी गंम्मत वाटली असावी, म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तो शिल्पी म्हणतोय तेव्हा तेव्हा तो खूप हसतोय, आत्ता ही सुरुवात आहे, वाट बघीन मी, त्याच्या कडून हे ऐकायची की, “आई तू खूप छान काम करतेस. आणि असंच काम करत राहा. तू मला वेळ फार देऊ शकत नाहीस पण तू माझ्या भविष्याची तरतूद करतेयस. आणि त्या पेक्षा महत्वाचं म्हणजे तू तुझी passion follow करतेय” बास..आणखी काय हवं असेल मला.. बास असेच छान छान प्रोजेक्ट्स मला मिळत राहो, तुम्हा सगळयांचं प्रेम असंच राहू द्या.
