कलाकार मंडळी ही त्यांच्या कामातून वेळात वेळ काढून स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी, कुटुंबासाठी वेळ देताना दिसतात. यांत अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या कुटुंबासोबत बरेचदा वेळ घालवताना दिसते. अशातच अमृताच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अमृता ही चित्रपट आणि फोटोशूटमुळे नेहमीच चेचेत असते. आता मात्र अमृता एका वेगळ्या गोष्टीमार्फत चर्चेत आली आहे. (Amruta Khanvilkar Ujjain Visit)
अमृता खानविलकर ही तिच्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून देव दर्शनाला गेली आहे. उज्जैनच्या श्री महाकालेश्वर या भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाला अमृताने भेट दिली आहे. अमृता तिच्या आई सोबत तेथे गेली आहे. आईसोबतचे मंदिराबाहेरील फोटो तिने सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. अमृताने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आहे. मंदिराबाहेरील एक फोटो शेअर करत ५२ शक्ती पिठोनमें से एक महत्वपूर्ण शक्तीपीठ असं कॅप्शन तिने या फोटोला दिल आहे.
पाहा अमृताने शेअर केला देवदर्शनाचा अनुभव (Amruta Khanvilkar Ujjain Visit)
अमृताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अमृताच्या चेहऱ्यावरून मंदिराची ऊर्जा, तिथलं वातावरण स्पष्ट जाणवतंय आणि अमृताने सुद्धा याबाबत भाष्य केलं आहे, नमस्कार मी आताच उज्जैन येथील महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगाच दर्शन घेतलं. भस्म आरती अनुभवली. मनापासून सांगतेय जर तुम्ही शिवभक्त असाल, नसाल तरीसुद्धा आयुष्यात एकदा तरी महाकाळेश्वराची भस्म आरती तुम्ही अनुभवावी. कारण या आरतीमध्ये इतकी पावर आहे, इतका नाद आहे की जो मला स्पीचलेस करून टाकतो.(Amruta Khanvilkar Ujjain Visit)
मी आणि माझी आई १ वाजता लाईन मध्ये उभे राहिलो आणि साधारण ४ वाजता दरवाजा उघडला. नंदी कक्षात बसण्याची संधी आम्हाला मिळाली. २ तासाची आरती आम्ही अनुभवली. हा अनुभव माझ्यासाठी ऊर्जा देणारा होता. तुम्ही जर कधी विचार केला नसले इथे येण्याचा तर प्लिज तो तुम्ही करा आणि आरतीचा अनुभव घ्या.ओम नमः शिवाय असं म्हणत तिने उज्जैन महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग येथील दर्शनाचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अमृताने महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग येथे एकदा तरी आयुष्यात प्रत्येकाने गेलं पाहिजे असं म्हणत तीच मत मांडलंय.