शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेत्री व नृत्यांगना मुक्ती मोहनचा विवाहसोहळा संपन्न, ‘अ‍ॅनिमल’ फेम ‘या’ अभिनेत्याबरोबर केलं लग्न, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 11, 2023 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
dancer and actress mukti mohan just married with animal fame actor kunal thakur photos viral on social media

अभिनेत्री व नृत्यांगना मुक्ती मोहनचा विवाहसोहळा संपन्न, 'अ‍ॅनिमल' फेम 'या' अभिनेत्याबरोबर केलं लग्न, फोटो व्हायरल

सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये लग्नसराईचे वारे वाहत आहेत. मराठी सिनेसृष्टीत प्रसाद-अमृता, सुरुची-पियुष यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. नुकतीच मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे हीदेखील सूर्या कुमारबरोबर विवाहबंधनात अडकली. तसेच मुग्धा व प्रथमेश हे दोघेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच बॉलिवूडमधील एक जोडीच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री मुक्ती मोहन विवाहबंधनात अडकली. काल (१० डिसेंबर) रोजी मुक्तीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.  (Mukti Mohan On Instagram)

सध्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. याच चित्रपटातील अभिनेता कुणाल ठाकूरबरोबर मुक्तीने लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांसह व सहकलारांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहतेही भलतेच खुश झाले आहेत. “त्वयि सम्प्रेक्ष्य भगवान्स्त्वया हि विवाह्यते।” असं कॅप्शन देत त्यांनी लग्नाचे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.  त्याचबरोबर “तुझ्यामध्ये मला माझे दैवी संबंध दिसले व आपले एकत्र येणे हे माझ्या नाशिबतच होते. देव, कुटुंब व मित्रांनी दिलेल्या आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. पती-पत्नी म्हणून आमच्या पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छंसाठी धन्यवाद” म्हटले आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवार व  सहकलाकरांनीही त्यांना कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mukti Mohan (@muktimohan)

आणखी वाचा – “दारु खूप जास्त झाली”, भर कार्यक्रमात अजिंक्य देव यांनी ओढली सिगारेट, व्हिडीओ पाहताच नेटकरी भडकले, म्हणाले, “वडिलांनी कमावलं ते मुलाने…”

बॉलिवूड सिनेसृष्टीतील कलाकारांची लग्नाचा थाट हा वेगळाच असतो. मुक्ती-कुणाल यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात झाला असून त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. मुक्तीने शेअर केलेल्या या लग्नाच्या फोटोत तिने पेस्टल रंगाचा व भरजरी नक्षी असलेला लेहेंगा परिधान केला आहे तर कुणालनेही तिच्या कपड्यांना साजेशी अशी शेरवाणी परिधान केली असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी गळ्यात गुलाबांचा सुंदर हारदेखील घातला आहे. तसेच या फोटोंमध्ये दोघेही अतिशय आनंदी व कमालीचे सुंदर दिसत आहेत.

आणखी वाचा – मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मुग्धा वैशंपायन लवकरच अडकणार विवाहबंधनात; ‘ब्राईड टू बी’ पार्टीच्या फोटोंनी वेधलं लक्ष

मुक्ती मोहनच्या लग्नसोहळ्यात तिच्या बहिणींनी व कुटुंबीयांनी देखील चांगलीच रंगत आणली होती. दरम्यान, मुक्ती ही एक अभिनेत्री व नृत्यांगना आहे. मुक्ती ‘जरा नचके देखा’, ‘नच बलिये’, ‘फियर फॅक्टर’ व ‘झलक दिखला जा ६’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमधुन लोकप्रिय झाली. त्याचबरोबर ‘साहेब’, ’बीवी और गँगस्टर’, ‘दारूवु’, ‘हेट स्टोरी’, ‘मुरान’ व ‘कांची’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तर कुणाल हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात दिसला होता. तसेच ‘कबीर सिंग’ व ‘कसौटी जिंदगी की’ या चित्रपटांमध्येही तो झळकला होता.

Tags: bollywood newscelebrity coupleentertainment newsmarriage photo
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Dunki VS Salaar

शाहरुख खानचा 'डंकी' व प्रभासच्या 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर, कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.