ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळ ही गाण्याची ओळ आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला माहित असेल यांत शंकाच नाही. अभिनयाचं चालत बोलतं विध्यापीठ अशी ख्याती असलेले दादा कोंडके सर्वांनाच माहित आहेत. अनेक विनोदी चित्रपट, लोकनाट्य रचत दादांनी मनोरंजन सृष्टी बहारदार बनवली. असा हा महान विनोदवीर आपल्या महाराष्ट्राला लाभला. (Dada Kondke Asha Bhosale)
अनेक नाटके, चित्रपट गाणी यांमधून दादा कोंडके या नावाला प्रसिद्धी मिळाली. दादा कोंडके यांचं गाजलेलं नाटक म्हणजे विच्छा माझी पुरी करा, या नाटकाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला, हे नाटक पाह्तानाचा एक किस्सा दादा कोंडके यांच्या निकटवर्तीयांनी सांगितला आहे, चला तर जाणून घेऊया नेमका काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा अशा ताईंनी दादा कोंडकेच हे नाटक पाहून निर्णय बदलला (Dada Kondke Asha Bhosale)
विच्छा माझी पुरी करा या नाटकादरम्यान घडलेला किस्सा सांगत दादांचे स्नेही म्हणाले की, एकदा सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या प्रयोगाला आल्या होत्या. कोणत्या तरी कौटुंबिक कारणानं त्या अतिशय विमनस्क होत्या. आत्महत्येचे विचारही त्यांच्या मनात येत होते. त्यांची खास मैत्रीण कवयित्री शांता शेळके यांनी यादरम्यान त्यांची समजूत घातली.(Dada Kondke Asha Bhosale)
हे देखील वाचा – महेश मांजरेकरांनी बनवली स्वतःच्या हाताने स्पेशल डिश
त्या आशाबाईंना म्हणाल्या, “आशा, एकदा माझ्याबरोबर “विच्छा माजी पुरी करा” बघ. म्हणजे तुझं डोकं ताळ्यावर येईल आणि त्यांनी अत्याग्रहानं त्यांना विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या प्रयोगाला आणलं. आशाबाई विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा प्रयोग पाहून एवढ्या खूश झाल्या, की त्यानंतर त्या सतत या नाटकांच्या प्रयोगाला येऊ लागल्या आणि मग त्या नॉर्मल झाल्या. दरम्यान दादा कोंडके यांच्या या नाटकाला पाहून त्या मनोमनी खूप खूश झाल्या. आणि या आनंदापोटी त्यांनी विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या सर्व कलावंतांना सोन्याच्या मणगटी साखळ्या भेट दिल्या आणि दादांनाही अतिशय किमती असं घड्याळ दिलं.(Dada Kondke Asha Bhosale)
दादांच्या विच्छा माझी पुरी करा या नाटकाने तेव्हा खूप धुमाकूळ घातला होता.
