सिनेविश्वात काही कलाकार मंडळी अशी आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या अभिनय कौशल्याने अनेकांची मन जिंकली आहेत. मात्र ही कलाकार मंडळी त्यांच्या अभिनय क्षेत्राव्यतिरिक्तही अनेक गोष्टी नेहमीच करत असतात. खाजगी आयुष्यात त्यांच्या अनेक हालचाली या सुरूच असतात. अशातच अभिनेते महेश मांजरेकर यांच्या शूटिंग व्यतिरिक्त काम करतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. (Mahesh Manjrekar Special Video)
दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून आजवर महेश मांजरेकर यांनी आपला चाहतावर्ग तयार केला. आता सिनेसृष्टीतून थोडंसं बाजूला येत ते त्यांची वेगळीच हौस पूर्ण करताना दिसत आहेत. महेश मांजरेकर यांचा एक जेवण करतानाचा व्हिडीओ अभिनेता आकाश ठोसरने सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर हे सुके बोंबील बनवताना दिसत आहेत.
पाहा मांजरेकरांनी काय बनवली स्पेशल डिश (Mahesh Manjrekar Special Video)
महेश मांजरेकर यांच्या लेकाने म्हणजेच सत्या मांजरेकर याने काही दिवसापूर्वीच सुका सुखी नावानं एक हॉटेल सुरु केलं. यामुळे सत्या बराच चर्चेतही आला होता. मांजरेकरांचं संपूर्ण कुटुंब हे खवैये आहे. त्यांच्या खवय्येगिरी आता बिझनेसच्या स्वरूपातून पाहायला मिळतेय. सत्याच्याच हॉटेलमध्ये मांजरेकरांनी जाऊन सुके बोंबील स्वतःच्या हाताने बनवले आहेत. (Mahesh Manjrekar Special Video)
हे देखील वाचा – बांदेकरांसाठी पत्नीने घेतला खास उखाणा
‘द मांजरेकर्स किचन’ या लोगोच सुका सुखी हे हॉटेल सुक्या मच्छीच्या डिशेश साठी प्रसिद्ध आहे. अभिनय दिग्दर्शना व्यतिरिक्त महेश मांजरेकर उत्तम कुक देखील आहेत हे या व्हिडीओवरून कळतंय. आकाश ठोसर याने हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला असून मांजरेकर स्पेशल असं कॅप्शन या व्हिडिओला दिल आहे.
महेश मांजरेकर यांच्या लेकाने अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त हॉटेल इंडस्ट्री निवडली आहे. सत्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.