मालिकांमुळे कलाकरांना प्रसिद्धी मिळते,कलाकार घर घरात पोहचतात.मालिकांसोबत रिऍलिटी शो मुळे देखील अनेक कलाकार सिनेसृष्टीला मिळतात.कलाकारांच्या कलेला रिऍलिटी शो मुळे वाव मिळतो.सादरीकरणाचं माध्यम मिळत. अनेक गायक, नृत्यकलाकर या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांच्या नजरेत येतात.(Abhijeet Sawant Family)
असाच रिऍलिटी शो मधून बाजी मारलेला, गायक इंडियन आयडॉल सीजन एकचा विजेता, म्हणजेच अभिजित सावंत.सर सुखाची श्रावणी,चलते चलते, मर जावा मीट जावा, अशी अनेक गाणी अभिजीतच्या नावावर कोरली गेली आहेत.आपका अभिजित सावंत हा त्याचा पहिला अल्बम होता.इंडियन आयडॉल व्यतिरिक्त देखील अनेक रिऍलिटी शोज मध्ये अभिजित पाहायला मिळाला.
पाहा अभिजितच्या कुटुंबाचे Unseen Photos (Abhijeet Sawant Family)
कामाच्या गडबडीतून, कलाकार म्हणून काम करताना कुटुंबाला कमी वेळ देता येतो, सध्या अनेक कलाकारांचे व्हेकेशन मोड सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.कलाकारांच्या इंटरनॅशनल ट्रिप्स सध्या चर्चेत आहेत.या कलाकारांच्या यादीत अभिजीतच नाव देखील आता सामील झालं आहे. अभिजित बायको आणि त्याच्या २ लहान मुलींसोबत डिस्नी ट्रिपला गेला आहे.त्याच्या या ट्रिपचे फोटोज आणि व्हिडिओज त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.अँड द वेकेशन्स बिगेन फ्रॉम डिजनी असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.(Abhijeet Sawant Family)
अभिजीतच्या आवाजातील गाणी ऐकायला प्रेक्षकांना जितकं आवडत तितकंच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला ही प्रेक्षक कायम उत्सुक असतात. अभिजीतची पत्नी शिल्पा त्यांच्या मुली आहाना आणि समीरा यांचे व्हिडिओज त्यांचे फॅमिली फोटोज बऱ्याचदा तिच्या सोशल मीडिययावरून शेअर करत असते. वडिलांप्रमाणेच अभिजीतच्या मुली देखील खूप ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं.

हे देखील वाचा : मामांनी साधला पापाराझींसोबत संवाद