‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या यादीत अभिनेता गौरव मोरे याचं नाव देखील आवर्जून घेतलं जातं. मात्र आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिऍलिटी शोमधून गौरव मोरेने कायमची एक्झिट घेतली असल्याची पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरुन गौरवने स्वतःच याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली तेव्हापासून गौरव मोरे विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. गौरव आता पुन्हा कधीच हास्यजत्रेत दिसणार नसल्याने अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. (Gaurav More Childhood Photo)
आजवर गौरवने त्याच्या विनोदी अभिनय शैलीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून त्यांनी काढता पाय घेतला असला तरी तो हिंदी रिऍलिटी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. या शोमध्ये त्याच्याबरोबर कुशल बद्रिके, हेमांगी कवी ही कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. याशिवाय गौरव अधून मधून मोठ्या पडद्यावरही झळकताना दिसतो. अनेक चित्रपटांमधून त्याची विनोदी शैली पाहायला मिळते. शिवाय ‘महापरिनिर्वाण’ या मराठी चित्रपटातही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे समोर आले आहे.

गौरव सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच गौरवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळत आहे. गौरवने त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केलेला पाहायला मिळत आहे. यावरून गौरव लहानपणी नेमका कसा दिसायचा हे पाहायला मिळत आहे. खूप क्युट असा फोटो त्याने यावेळी चाहत्यांसह शेअर केला आहे
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव घराघरांत पोहोचला. आता या कार्यक्रमातून एक्झिट घेत असल्याची कळताच गौरवला नेटकऱ्यांनी ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. तर काहींनी त्याला पाठिंबा दर्शवित त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.