कलाकारांची मांदियाळी आणि सामाजिक विषय हाताळणारा चौकचा टिझर म्हणतोय ‘ वाघ आला वाघ’

Chaouk Marathi Movie Teaser
Chaouk Marathi Movie Teaser

सध्या मराठी चित्रपटांच्या रांगाच लागल्यात. रोमँटिक, आशयघन चित्रपटांची चलती असताना एका वेगळ्याच विषयावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ हा तो चित्रपट असून एका आशयघन कथेशी हा चित्रपट येत्या १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरने चांगलंच धुमाकूळ घातलाय. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.(Chowk Marathi Movie Teaser)

पहा चौक चित्रपटाच्या टीझरमध्ये काय आहे खास बात (Chowk Marathi Movie Teaser)

टीझरची सुरूवात होतेय ती भव्य गर्दीने. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण या चित्रपटादरम्यान पाहायला मिळणार आहे. चौक म्हटलं की चव्हाट्यावरच्या गप्पा, थट्टा, मस्करी आलीच. वा एखाद्या गंभीर विषयावर भाष्य ही आलंच. गणेशोत्सवादरम्यानची धमाल मस्तीही त्यात आली. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटातून याचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा – ‘प्रियाच्या बालपणीचं घर’ -आठवणीत शेअर केला व्हिडिओ

याशिवाय टिझरमध्ये पाहिल्याप्रमाणे कलाकारांची मांदियाळी यांत पाहायला मिळतेय. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील. यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार हे नक्की!(Chowk Marathi Movie Teaser)

चौकच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रविण तरडेंची खास शैली, रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांची वेगळी भूमिका, उपेंद्र लिमयेंचा रांगडा अभिनय, स्नेहल तरडे व संस्कृती बालगुडे यांच्या संवेदनशील भूमिका आपल्याला चौकमध्ये बघायला मिळतील. तर, किरण गायकवाड चौकमध्ये तरूणाईचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय, चौकच्या निमित्ताने किरण प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसेल.

हे देखील वाचा – सचिन गोस्वामी देतात कुस्तीचे धडे,हास्यजत्रा BTS व्हायरल

टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे संवादांनी… सुरवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे वाघ’ हा संवाद असो किंवा टीझरच्या शेवटी किरणचा ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ हा संवाद असो, यावरून असं लक्षात येतंय की अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी लेखन, संवाद, कथा, पटकथा या सर्वच पातळ्या अचूक हेरल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या बाजूंनी एकाच चौकात आलेले हे सर्व कलाकार आपल्यासमोर नक्की काय घेऊन येत आहेत, हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. टीझरमध्ये वाजणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे देखील हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.(Chowk Marathi Movie Teaser)

‘चौक’चित्रपट अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) निर्मित असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. त्यामुळे आता त्यांची दिग्दर्शनातील जादू पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rasika Sunil Suyog Kissing scene
Read More

‘आता आमच्या दोघांची लग्न झाली आहेत पण…’अभिनेत्री रसिकाने शेअर केला किसिंग सिन बाबतचा तो किस्सा

चित्रपटात आपण एखादा सीन पाहताना जेवढा आनंद होतो कलाकारासाठी ते तेवढच अवघड असत तो सीन पडद्यावर साकारणं. बऱ्याचदा…
Butterfly New Marathi Movie
Read More

का छोट्याश्या गोष्टीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होत ह्याची गोष्ट सांगणारा “बटरफ्लाय”!!

मनोरंजन विश्वात अनेक विषयांवर चित्रपट येत असतात. सामान्य होममेकरच्या जीवनावर आधारित असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. उत्तम…
Get Together Upcoming Movie
Read More

“गेट टूगेदर” या चित्रपटात पाहायला मिळणार पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट- देवमाणूस फेम एकनाथ गीतेची मुख्य भूमिका

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग…
New marathi movie
Read More

आई कुठे काय करते मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचं मोठ्या पडद्यावर आगमन लेखक म्हणून पार पडणार महत्वाची भूमिका

कोणत्याही कलाकाराच्या एखाद्या चित्रपटातील, मालिकेतील भूमिकेवरून त्याच्या कलेची तुलना करणं हे चुकीचं असत कारण एखादा कलाकार हा कोणत्याही…
Get together marathi movie
Read More

कायम आठवणीत राहिलेल्या पहिल्या प्रेमाचं होणार ‘गेट टुगेदर’.प्रेमाची आठवन करून देणारा नवा कोरा चित्रपट १९ मेपासून प्रदर्शित

प्रेम, शाळा, कॉलेज अशा अनेक जवळच्या विषयांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट येत असतात. असं म्हणतात पहिलं प्रेम कोणाला…
Baloch Official Teaser
Read More

पुन्हा एकदा रंगणार प्रवीण तरडे-पिट्या भाईची केमीस्ट्री बलोच मध्ये पिट्या भाई दिसणार ‘या’ भूमिकेत

मराठ्यांच्या अजरामर शौर्य गाथांमध्ये काही महत्वाच्या कथा अजूनही अनुत्तरित आहेत असाच काही शौर्यगाथानांवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…