काही कलाकार त्यांच्या हटके अंदाजामुळे प्रेक्षकांचे लाडके असतात. अशीच एक लाडकी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिच्या अभिनयातील सहजतेने तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.अनेक दमदार चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे.काकस्पर्श, टाईमपास २ या दोन्ही चित्रपटानंमध्ये तिने २ टोकांच्या भूमिका साकारल्या आहेत. तरी दोन्ही भूमिका साकारणं तिला उत्तम जमलं आहे. (Priya Bapat)
तसेच उमेश आणि तिची जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सिनेसृष्टीतील आवडत जोडपं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात. त्यांच्यातली केमिस्ट्री कायमच प्रेक्षकांना आवडते. त्यांच्यातला समजूतदारपणा, एकमेकांना प्रोत्सहन देणं ही बाब प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. ऑफस्क्रीन प्रमाणे ते ऑनस्क्रीन ही एकत्र फार छान दिसतात. टाइम प्लिज या चित्रपटात ते एकत्र पहायला मिळाले होते. तसेच त्यांच्या आणि काय हवं या वेब्सिरीजने तर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
हे देखील वाचा : प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूटव्हिडियो पाहून चाहते घायाळ
त्याच सोबत तिच्या वेग वेगळ्या फोटोशूट्स मुळे देखील ती कायम चर्चेत असते.कलाकारांच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घेणं कायमच प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय असतो.कलाकारांचे कुटुंब, खऱ्या आयुष्यातील पती पत्नी हे कायमचे चर्चेचे विषय असतात.अशातच प्रिया बापट ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून Dadar the home where i grew up असे कॅप्शन देत तिच्या दादर मधल्या घराचा व्हिडिओ स्टोरीवर शेअर केला आहे. बालपण हे प्रत्येकासाठी खास असत. आणि ते बालपण आपण ज्या वास्तूत घालवतो ती वास्तू हि तितकीच खास असते. म्हणूनच जगाच्या कोणत्या हि टोकाला असू तरी लहानपणीच ते घर प्रत्येकासाठी विशेष असत. त्या घरामध्ये एक भावनिक गुंफण असते. आणि ती जागा आपलं बालपण कायम जिवंत ठेवते. (Priya Bapat)
तसेच प्रियाला वेग वेगळ्या जागा बघायला प्रवास करायला देखील आवडत.या संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओ ती शेअर करत असते. तसेच फिटनेसच्या बाबतही प्रिया विशेष लक्ष देते. तिचे वर्कआऊट चे फोटोज, व्हिडीओज कायम चर्चेत असतात.प्रियाचं असा बॅलेन्स आणि हसरं व्यकितमत्व प्रेक्षकांना कायम भुरळ घालत.