शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चेहऱ्यावर खूप पिंपल, ग्रामीण भाषा अन्…”, परभणीची भाकरी म्हणून अभिजीत खांडकेकरला हिणवायचे लोक, म्हणाला, “तो काळ फार वाईट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 26, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Khandkekar Childhood Memory

"चेहऱ्यावर खूप पिंपल, ग्रामीण भाषा अन्...", परभणीची भाकरी म्हणून अभिजीत खांडकेकरला हिणवायचे लोक, म्हणाला, "तो काळ फार वाईट..."

मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून अभिनेता अभिजीत खांडकेकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकाविश्वामुळे अभिजीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या अभिजीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळे अभिजीत प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आता बिनधास्त अभिनय करणारा, सूत्रसंचालनाची धुरा पेलवणारा अभिजीत लहानपणी नेमका कसा होता याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Abhijeet Khandkekar Childhood Memory)

अभिजीतने नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा, मस्ती पॉडकास्ट’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिजीतने लहानपणी त्याला भाषेमुळे व दिसण्यामुळे कसा न्यूनगंड वाटायचा याबाबत खुलासा केला. यावेळी बोलताना अभिजीत म्हणाला, “मी बीड परभणीला होतो तेव्हा साधारण पाचवी सहावीत होतो. इयत्ता सहावीमध्ये मी नाशिकला आलो. कारण बाबांना तेव्हा असं वाटत होतं की, आमचं शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावं. बीड-परभणीसारख्या ग्रामीण भागात मी बराच काळ घालवला, त्यामुळे माझे उच्चार, माझा लहेजा हा बऱ्यापैकी ग्रामीण होता. त्यात मी वयात येत असल्यामुळे माझा आवाज चिरकायचा, चेहऱ्यावर खूप पिंपल, अत्यंत बारीक दिसायचो. त्यामुळे आपण बरे दिसत नाही, आपला आवाज बरा नाही, आपल्याला नीट बोलता येत नाही, आपली भाषा, उच्चार नीट नाहीत, असं मला वाटायचं. मला तेव्हा परभणीची भाकर म्हणून चिडवायचे”.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आशुतोष केळकर नेमकं काय करतो?, सध्या करत आहे ‘हे’ काम

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

पुढे तो म्हणाला, “तेव्हा तो बराच काळ असा होता, कारण शुद्ध तुपाला पिवर तूप असंच म्हटलं जायचं. तिकडे सगळे लोक पिवर म्हणतात. मराठवाड्यातले काही उच्चार युनिक आहेत. हातरुमालाला दस्ती म्हणतात, बादलीला बकेट म्हणतात. बीड, परभणीमध्ये म्हणजेच आमच्या घरी अशी भाषा बोलली जायची. शहराकडे आल्यानंतर याच भाषेवर हसलं जायचं. मला असं झालं की, आपलं काहीचं बर नाही आहे का?, मराठी जाऊदे, पण इंग्रजी माध्यमांमध्ये त्याकाळी पाचवीपासून एबीसीडी शिकवायचे. इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, मराठी येत आहे पण त्यावरही हसतायत आपल्याला सगळे, त्यामुळे मी खूप घाबरून गेलो होतो”.

आणखी वाचा – ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची मराठी मालिकेमध्ये एन्ट्री, सात वर्षांचा लीप आल्यानंतर कथेमध्ये ट्विस्ट

ही भीती कशी घालवली याबाबत बोलताना तो म्हणाला, “साधारण सातवी आठवीचा काळ माझ्यासाठी फार वाईट होता. अर्थात नंतर मित्र झाले. त्यांच्यात मैत्री झाली. त्यावेळी मला एक चपराक बसली. मग मी कोण कसं बोलतं याचं निरीक्षण करू लागलो. उच्चार नीट ऐकू लागलो. काही कळत नसलं तरी इंग्रजी वर्तमानपत्रे वाचू लागलो. त्यावेळी मी शिकलो. सगळं वाचायला लागलो. तेव्हा मी ठरवलं होतं, आता मी माझी भाषा बदलूनच राहणार. हा भयंकर न्यूनगंड त्याकाळी माझ्यामध्ये काही काळ होता. मी आज जो काही आहे तो या गोष्टींमधून मी शिकलो म्हणून आहे, असं मला वाटतं”.

Tags: abhijeet khandkekarAbhijeet Khandkekar Childhood Memoryentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Paaru Serial Update

आदित्यसमोर येणार दिशाचा खरा चेहरा?, अहिल्यादेवी पारूचा जीव वाचवायला पोहोचणार का?, मालिकेत नवा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.