बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्यसमोर येणार दिशाचा खरा चेहरा?, अहिल्यादेवी पारूचा जीव वाचवायला पोहोचणार का?, मालिकेत नवा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 27, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

आदित्यसमोर येणार दिशाचा खरा चेहरा?, अहिल्यादेवी पारूचा जीव वाचवायला पोहोचणार का?, मालिकेत नवा ट्विस्ट

‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेत खूप मोठं रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारूने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. पारूला चक्कर येताच तिला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन जातात. तेव्हा तिथे गेल्यावर कळतं की, तिची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर डॉक्टर सर्वांना सांगतात की, कमीत कमी सहा तास आहेत तेवढ्या वेळात रुग्णाला बॉम्बे ब्लड ग्रुप हा मिळायलाच हवा. पेशंटला रक्ताची फारच आवश्यकता आहे. नाहीतर पेशंट कोमामध्ये जाईल. (Paaru Serial Update)

आदित्य प्रीतम तो ब्लडग्रुप मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करतात मात्र पारूचा ब्लड ग्रुप हा कुठेच उपलब्ध नसतो. त्यानंतर आदित्यचे वडील तिथे आलेले असतात त्यांना ही गोष्ट कळते तेव्हा ते म्हणतात की अहिल्याचा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. आपल्याला अहिल्याला पारूचा जीव वाचविण्यासाठी इथे आणायलाच लागेल, असं म्हणून ते निघून जातात. तितक्यात दामिनी दिशाला फोन करून सांगते की, पारूला रक्ताची गरज आहे म्हणून भावोजी अहिल्या वहिनींना आणायला निघाले आहेत. अहिल्या वहिनींचा आणि पारूचा ब्लड ग्रुप एकच आहे हे ऐकल्यावर दिशा प्लॅन करते आणि डॉक्टरांनी दिलेल्या झोपेच्या गोळ्या दुधात घालून अहिल्यादेवींना देते त्याने अहिल्यादेवींना झोप लागते.

आणखी वाचा – “चेहऱ्यावर खूप पिंपल, ग्रामीण भाषा अन्…”, परभणीची भाकरी म्हणून अभिजीत खांडकेकरला हिणवायचे लोक, म्हणाला, “तो काळ फार वाईट…”

View this post on Instagram

A post shared by Paaru (@trrump_paaru)

अहिल्यादेवी काही केल्या उठतच नाहीत हे पाहून ते आदित्यला ही गोष्ट सांगतात. तेव्हा आदित्यही काळजीत सांगतो की, तुम्ही तिला उठवायचा प्रयत्न करा. मात्र अहिल्यादेवी काही केल्या उठत नाही कारण त्या गाढ झोपलेल्या असतात. त्यानंतर दामिनी व दिशा पुन्हा एकदा एकमेकींना फोन करतात आणि दामिनी दिशाचं कौतुक करते की, तू ही बाजी कशी मारलीस?, तुला सगळं कसं अचूक जमतं. यावर दिशा दामिनीची अक्कल काढत तिला ऐकवून दाखवते. पारूचा जीव धोक्यात आहे, जर ब्लड मिळालं नाही तर ती मरू शकते हे ऐकल्यावर दिशाला खूप आनंद होतो. दिशादेखील मला सुद्धा ही गुडन्यूज ऐकायची खूप उत्सुकता लागून राहिली आहे, असं सांगते.

आणखी वाचा – वर्षभरही लग्न टिकणार नाही म्हणून लोकांना वाटलं अन्…; क्षिती जोगचा खुलासा, म्हणाली, “माझे आधीचे बॉयफ्रेंड्स…”

आता काही अहिल्यादेवी उद्या सकाळपर्यंत उठत नसते असं बोलून दिशा फोन ठेवणार इतक्यात दामिनी दिशाला म्हणते की आदित्य वाटतं वहिनींना आणायला घरी गेला आहे. तेव्हा दिशा ते फार मनावर घेत नाही आणि म्हणते की, आता कोणी आलं तरी सासू मॉम उठणार नाहीत, हे बोलत असतानाच पाठीमागे आदित्य येऊन उभा असतो. आता आदित्यने दिशाचं सगळं बोलणं ऐकलेलं असेल का?, दिशाचा डाव पलटणार का?, पारूला अहिल्यादेवी रक्त द्यायला पोहोचणार का?, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaru marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Yash And Arohi Wedding

कुर्यात सदा मंगलम्! 'आई कुठे…' मधील यश व आरोहीचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.