‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येत असलेली पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत आलेल्या वेगवेगळ्या पात्रांनी तसेच मालिकेच्या कथानकाने ही मालिका आणखी एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. सध्या मालिकेत यश व आरोहीची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यश व आरोही नुकतेच लग्न बंधनात अडकलेले पाहायला मिळत आहेत. देशमुखांच्या घरीच अगदी शाही थाटामाटात त्यांचा लग्न सोहळा पार पडलेला पाहायला मिळाला. (Yash And Arohi Wedding)
यश व आरोही दोघेही लग्नासाठी खूप खुश असलेले दिसले. तर देशमुखांच्या घरी ही आनंदाचं वातावरण असलेलं पाहायला मिळालं. तर आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधती ही देशमुखांच्या घरीच राहायला आलेली असून यश व आरोहीचं लग्न होईपर्यंत ती देशमुखांकडेच राहणार असते. मात्र ही गोष्ट काही संजनाला पटलेली नसते, त्यामुळे संजना या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतच असते.
आता संजनाचे सगळे डाव उधळून यश व आरोहिचं अखेर लग्न लागलेलं असतं. यावेळी नववधू-वराच्या खास लूकची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आरोहीने यावेळी लाल पैठणीची नऊवारी साडी नेसली होती तर यशने पैठणीचं जॅकेट परिधान केलेला पाहायला मिळालं. आरोहीच्या मोत्यांच्या दागिन्यांनी ती खूपच सुंदर दिसत होती. दोघांनी एकमेकांना अगदी साजेसे कपडे परिधान केले होते.
अगदी पारंपरिक अंदाजात ही जोडी अधिकच लक्षवेधी ठरली. आरोही व यशच्या लग्नात संजना व अरुंधतीने आरोहीला कानमंत्र ही दिलेले पाहायला मिळाले. आरोही व यशचा सुखी संसार मालिकेत पाहायला मिळणार का?, की त्यांच्यातही काही वाद होणार?, की मालिका अजून कोणत्या प्रकारे वळण घेणार किंवा यश व आरोहीचं लग्न झाल्यानंतर अरुंधती देशमुखांच्या घरी राहणं पसंत करणार का? की, ती इथून निघून जाणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.