शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भाऊ कदम उलटा सदरा-लेंगा घालून स्टेजवर पोहोचले अन्…; स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “अचानक काय झालं समजलं नाही तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 3, 2024 | 7:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actor bhau kadam

भाऊ कदम उलटा सदरा-लेंगा घालून स्टेजवर पोहोचले अन्…; स्वतःच केला खुलासा, म्हणाले, "अचानक काय झालं समजलं नाही तेव्हा…"

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. सर्वच कलाकारांनी संपूर्ण महाराष्ट्राला अगदी खळखळून हसवलं. १० वर्षांनी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षक देखील या कार्यक्रमाला खूप मिस करत आहेत. या कार्यक्रमातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणजे भाऊ कदम. विनोदाचे अचूक टायमिंग, चपखल अभिनय यामुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांचे महाराष्ट्रात लाखों चाहते आहेत. भाऊ हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आले आहेत.  (actor bhau kadam )

भाऊ यांनी अनेक मालिका, चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. त्यांनी नाटक करतानाचा एक मजेशीर किस्सा प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. त्यांनी एका नाटकावेळची आठवण सांगताना म्हणाले की, “अभिनेते संजय नार्वेकर यांच्याबरोबर ‘बाजीराव मस्त मी’ हे नाटक करत होतो. त्या नाटकात एक ब्लॅक आऊट व्हायचा आणि त्यावेळी मी कपडे बदलून यायचो. ही सर्व क्रिया खूप पटापट व्हायची. त्यावेळी मला लेंगा व सदरा घालायचा होता. मी ते घालून स्टेजवर लगेच गेलो. तेव्हा माझ्याकडे संजय सरांनी पाहिलं आणि ते हसू लागले”.

आणखी वाचा – भाऊ कदम यांनी शेअर केला पत्नीचा बदलता लूक, मोठ्या मंगळसूत्राने वेधलं सर्वाधिक लक्ष, डिझाइन आहे फारच सुंदर

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुढे ते म्हणाले की, “अचानक काय झालं हे मला समजलं नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की मी लेंगा उलटा घातला होता. त्याची नाडी पुढे असण्याऐवजी मागे होती आणि सदऱ्याचा मागचा गळा पुढे होता. पण मी स्टेजवर असल्याने काहीही करु शकत नव्हतो. पण ती भूमिका हॉस्पिटलमधून पळालेल्या वडिलांची भूमिका असल्याने इतके वेगळे काही वाटले नाही. ही गोष्ट फक्त आमच्याच लक्षात आली होती”.   

आणखी वाचा – १२ बेडरुम, स्विमिंग पूल आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केलं ईशा अंबानीचं प्रशस्त घर, किंमत आहे तब्बल…

हा किस्सा सांगताना त्यांनी या नाटकाच्या वेळच्या सर्व आठवणी ताज्या केल्या. या नाटकाच्या दरम्याने प्रेक्षकांचे मिळालेले प्रेम, संजय यांच्याबरोबर काम करण्यासाठी मिळालेली संधी यामुळे ते खूपच खुश होती. त्यांच्या ‘बाजीराव मस्त मी’ या नाटकाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर आता ते नीलेश साबळेबरोबर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!!’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्याबरोबर अभिनेता ओंकार भोजनेची धमाल कॉमेडी पाहायला मिळणार आहे.  

Tags: bajirao mast mebhau kadamdramamarathi playmemory
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
boney kapoor on anil kapoor

कपूर कुटुंबियांमध्ये वाद, अनिल कपूर यांच्याबरोबर भांडण झाल्यानंतर बोनी कपूर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, "त्याला वाइट वाटत असेल तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.