‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने गेली दहा वर्ष प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. मात्र नुकताच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाने निरोप घेतल्याने सारे प्रेक्षक या कार्यक्रमाला मिस करत आहेत. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदमशिवाय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला शोभाच येणार नाही, असं हमखास म्हटलं जायचं. विनोदाचे अचूक टायमिंग वा कोणतीही भूमिका असो त्यात चपखल अभिनय करणाऱ्या भाऊ कदम यांचे लाखो चाहते आहेत. (Bhau Kadam Wife Mangalsutra)
भाऊ कदम हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. विशेषतः भाऊ त्याच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून ते वेळात वेळ काढून त्यांच्या कुटुंबियांसह वेळ घालवतात. नुकताच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने निरोप घेताच शुटिंगमधून फ्री झाल्यांनतर भाऊ त्याच्या कुटुंबासह नागपूर येथे फिरायला गेला होता.
भाऊ कदम त्याच्या पत्नीबरोबरचेही अनेक फोटो शेअर करत असतो. नुकताच भाऊ कदम यांनी त्यांच्या पत्नीचा म्हणजे ममता कदम यांचा एक सुंदर फोटो त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन पोस्ट केला आहे. भाऊ कदम यांच्या बायकोच्या या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये त्यांच्या पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भरपूर सोन्याने मढलेलं हे मंगळसूत्र अधिक लक्षवेधी ठरत आहे. खूप मोठं आणि कमीत कमी काळ्या मण्यांचा वापर करत तसेच खास डिझाइनच्या पेंडंटने लक्ष वेधून घेतले आहे.
भाऊ कदम आणि त्यांची पत्नी यांचा प्रेमविवाह आहे याची फारशी कोणाला कल्पनाच नाही. एका कार्यक्रमात त्यांनी त्यांची पत्नी ही पहिली त्यांची विद्यार्थिनी होती असं सांगितलं होतं. दहावीमध्ये एका विषयात नापास झाल्याने भाऊ कदम यांच्याकडे ती शिकायला यायची आणि आपण तिला चांगला चोप दिला आहे, असंही ते म्हणाले होते. दोघांच्याही कुटुंबाच्या मर्जीने हे लग्न झाले. भाऊ कदम यांच्या पत्नीने त्यांच्या पडत्या काळापासून त्यांना कायम साथ दिली आहे.