भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सध्या तिच्याबद्दल खूप चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचा अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील अलीशान बंगला हॉलिवूड सिंगर जेनिफर लोपेज व बेन एफ्लेक यांनी खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या बंगल्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या बंगल्याच्या व्यवहारानंतर सर्वच ठिकाणी चर्चा सुरु झाल्या आहेत. (jennifer lopez new home in LA)
जेनिफर लोपेजने २०२२ साली बेन एफ्लेकबरोबर चौथे लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर सुमारे ३३३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. एक डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अमेरिकेत तसेच भारतातही जेनिफरचे अनेक चाहते आहेत. ईशा अंबानीकडून खरेदी करण्यात आलेला बंगला हा जवळपास ३८,००० स्क्वेअर फुटमध्ये पसरला आहे. यामध्ये स्वतंत्र जीम, स्पा,सलून व इनडोअर बॅडमिंटन कोर्ट आहे. तसेच या बंगल्यामध्ये १२ बेडरूम व २४ बाथरुम आहेत.
ईशाच्या सासू-सासऱ्यांनी तिला लग्नासाठी मुंबईमध्ये सी-फेसिंग बंगला भेट म्हणून दिला होता. हा बंगलादेखील खूप अलिशान आहे. त्या बंगल्याची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे. हा बंगला विशेषतः 3D डायमंड थीममध्ये डिझाइन केला आहे. या बंगल्याचे नाव गुलिता आहे. हा अल्ट्रा लक्झरी बंगला सुमारे ५० हजार स्क्वेअरफुटमध्ये पसरला आहे. तसेच या बंगल्याची किंमत सुमारे ५०० कोटी रुपये आहे. या बंगल्यामध्ये तीन तळघरं, जेवणाच्या खोल्या व एक जलतरण तलाव तसेच एक मोठा हॉल देखील आहे.
दरम्यान ईशा अंबानीचा धाकटा भाऊ अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात दिसून आली होती. यावेळी तिने घातलेल्या ब्लाऊजची चर्चा सर्वत्र रंगली. तिने घातलेल्या ब्लाऊजवर सर्व सोन्याचे, हिरेजडीत दागिन्यांचे छोटे छोटे भाग लावण्यात आले होते. तिच्या या ब्लाऊजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी ती तिच्या मुलांना शाळेमधून आणायला गेली असतानाचाही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.