बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटनिर्माते बोनी कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘मैदान’च्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याट आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी बोनी यांनी आपल्या खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केले आहे. नुकताच त्यांनी अनिल कपूर यांच्या नात्यामध्ये असलेल्या भांडणाबद्दल व्यक्त झाले आहेत. (boney kapoor on anil kapoor )
रिपोर्ट्सनुसार, ‘नो एंट्री २’ या चित्रपटाची स्टारकास्ट समोर आली. त्यानंतर अनिल ही बोनी यांच्याबरोबर बोलत नसल्याचे समोर आले होत्रे. यावर भाष्य करताना बोनी यांनी सांगितले होतं की त्यांचं विधान हे मस्करीमध्ये बोलले गेले होते . पण त्याचा अनर्थ केला गेला.
ते म्हणाले की, “मीडियाने मी बोललेल्या वाक्याचा विपर्यास केला. मी केवळ अनिल माझ्यावर रागावला आहे असे म्हणालो होतो. पण मी सलमान व अनिल यांना या चित्रपटासाठी विचारले नव्हते. कारण दोघेही खूप व्यस्त कलाकार आहेत. तसेच हा चित्रपट पिढीतील कलाकारांना घेऊन बनवायचा विचार मी केला आहे”.
ते पुढे म्हणाले की, “ते दोघेही या चित्रपटाचा भाग नाहीत हे ऐकून कदाचित दोघेही माझ्यावर रागावले असतील. कदाचित ‘नो एंट्री’च्या दुसऱ्या भागासाठी अनिल व सलमानची गरज असेल पण त्या दोघांना या चित्रपटाची गरज नाही”, हे सर्व मस्करी म्हणून मीडियासमोर बोलले होते. तसेच ते पुढे म्हणाले की, “या येत्या दोन वर्षांमध्ये अनिलकडे चित्रपटासाठी तारखा नाहीत. तरीही माझे विधान हे चुकीच्या पद्धतीने फिरवले गेले. पण तरीही अनिलला वाइट वाटलं असेल तर मी स्वतः त्याच्याशी बोलेन आणि सर्व क्लियर करेन. आम्ही दोघंही एकाच क्षेत्रामध्ये वाढलो आहोत. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात आम्ही एकमेकांच्या बरोबर राहिलो आहोत”.
‘नो एंट्री २’ या चित्रपटामध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर व दिलजित दोसांज हे महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. इतर कलाकार कोण असतील याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.