शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिकेला गंभीर आजार, आता झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “स्वतःवर लक्ष देत आहे आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 5, 2024 | 2:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neha Bhasin viral post

नेहा भसीन करत आहे गंभीर आजारांचा सामना

Neha Bhasin viral post : ‘स्वॅग से स्वागत’ या गाण्यामुळे अभिनेत्री व गायिका नेहा भसीन ही अधिक लोकप्रिय झाली. वेगळा आवाज, कणखरता यामुळे तिला अनेक गाणी गाण्याची संधीदेखील मिळाली. सध्या नेहा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसत आहे. तिला अनेकदा एअरपोर्ट, जिम या ठिकाणी स्पॉट केले जाते. त्याचप्रमाणे तिने फिटनेसचीही अधिक काळजी घेतलेली दिसून येते. तिच्या फिटनेसची चर्चादेखील अधिक प्रमाणात होताना दिसते.  आशातच आता तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमुळे अनेकांना धक्कादेखील बसला आहे.

तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रीमॅन्स्ट्रूअल डिस्फोरिक डिसऑर्डर, ऑब्सेसिव कंपल्सिव पर्सनॅलिटी डिसऑर्डर व फायब्रोमायल्जिया अशा मानसिक तसेच हार्मोनल समस्यांवर भाष्य केले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला खूप काही सांगायचे आहे.पण नक्की सुरु कुठून करु हे मला सांगता येत नाही आहे. मला खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबद्दल मला सांगतानाही त्रास् होत आहे. हे सगळं माहीत पडल्यानंतर अखेर माझे उपाचार झाले आणि माझी या नरकातून सुटका झाली. जेव्हा मी २० वर्षांची होते तेव्हा मला याची माहिती मिळाली आणि वेळेवर उपचार घेऊ शकले”.

आणखी वाचा – Video : लग्नानंतर बदलतो नवरा, जिनिलीया देशमुखच्या Birthday साठी रितेश देशमुखचा व्हिडीओ, म्हणाला, “बायको…”

View this post on Instagram

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

पुढे तिने लिहिले की, “मानसिक थकवा, शारीरिक दुखणं, नैराश्य, चिंता, झोपेची आवश्यकता हे सगळं काही ठीक झालं. कॉग्निटीव्ह थेरपी, योगासने, तणाव कमी करण्यासाठी अधिक काम न करणे, ज्या लोकांवर मी प्रेम करते त्यांना भेटणे हे सगळं मी करत होते. हे सगळं आरामदायक वाटत होतं. पण याच आरामामुळे तुम्ही किती थकला आहात हे समजून येते. मी सध्या यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. स्वतःवर लक्ष देत आहे. डान्स, व्यायाम हे सगळं करत आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathiच्या घरात जाण्याची विशाखा सुभेदारांची इच्छा, शोमध्ये जाण्यावरुन प्रश्न विचारताच म्हणाल्या, “पुढच्या वेळी…”

नेहाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लवकरच बरी व्हावी असेही चाहत्यांनी म्हंटले आहे. नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटासाठी एक गाणे गायले आहे. तिच्या अनेक गाण्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

Tags: bollywood singerinstagram postneha bhasin
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Update purushottam patil on varsha usgaonkar and nikki tamboli

"वर्षाताईही ताणून धरतात", Bigg Boss Marathi मधून बाहेर आल्यानंतर पुरुषोत्तमदादांचे मोठे खुलासे, घरात नक्की कशी असते परिस्थिती?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.