Genelia Deshmukh Birthday : रितेश आणि जिनिलीया देशमुख ही जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. रितेशला प्रत्येक गोष्टीत जिनिलीयाने खंबीरपणे साथ दिली. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. हे दोघे नेहमीच काही ना काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या दोन्ही मुलांचे अनेक रीलही ते शेअर करत असतात. अशातच आज रितेशच्या बायकोचा म्हणजेच जिनिलीयाचं वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त रितेशने खास रोमॅंटिक फोटो असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Riteish Deshmukh wished his wife Genelia)
जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त एक मजेशीर रील व्हिडीओ बनवत रितेशने आपल्या लाडक्या बायकोला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये लग्नाआधी व लग्नानंतरच्या नवऱ्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. यामध्ये तो लग्नाआधी नवऱ्याची परिस्थिती दाखवताना जिनिलीयासाठी “तुमसे कोई प्यारा, मासूम नही है, क्या चीज हो तूम खुदको मालूम नही है” हे गाणं म्हणताना दिसत आहे हे गाणं गाताना त्याने बायकोला किसदेखील केलं आहे. तर लग्नानंतरची परिस्थिती दाखवताना तो तुमही ने मेरी जिंदगी खराब की है” असं म्हणत आहे. तसेच हे गाणं म्हणताना तो बायकोचे पायही दाबत आहे.
रितेशने हा खास व्हिडीओ शेअर करत बायकोला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बायको. तुझ्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे” असं म्हटलं आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रितेश व जिनिलीया यांचा खास बॉण्डही दिसून येत आहे. जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे.
या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच चाहत्यांनी जिनिलीयाला वाढदिवसानिमित्त कमेंट्सद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, जिनिलीयाने जवळपास १० वर्ष चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता. घर, संसार, मुलं सांभाळण्यात ती रमली होती. कामाबरोबरच तिने तिच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. जिनिलीयाची हिच खासियत सगळ्यांना आवडते. इतकंच नव्हे तर जिनिलीया मराठी संस्कृतीही जपते.