Bigg Boss Marathi Season 5 Update : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एका पेक्षा एक असलेल्या या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या सीझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख यांनी सांभाळली आहे. यंदाच्या या पर्वाच्या सीझनमधून पहिलं एलिमिनेशन समोर आलं. कीर्तनकार पुरुषोत्त्तम दादा पाटील यांचं या एलिमिनेशनमध्ये नाव आलं असून त्यांना ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घ्यावा लागला. ‘बिग बॉस’च्या घरातून निघताना पुरुषोत्तम दादा यांच्या एका कृतीने समस्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मन जिंकली.
‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तम दादा यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संतांचा जयजयकार केला. त्यांच्या या कृतीने साऱ्यांची मन जिंकली आणि त्यांचं कौतुक करण्यात आलं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील यांनी ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी पुरुषोत्तम दादा पाटील यांना वर्षा ताई व निकी तांबोळी यांच्या भांडणांबाबत मत विचारलं. त्यावेळी वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यामध्ये होत असलेल्या भांडणांबाबत पुरुषोत्तमदादांनी घराबाहेर पडल्यानंतर भाष्य केलं.
ते म्हणाले, “मी निक्कीला बोललो की तू जे शब्द वापरत आहेस त्यापद्धतीने तू बोलू नकोस. तेव्हा ती मला म्हणाली की हे तुम्ही मला सांगू नका. ‘बिग बॉस’ मला हे सांगतील. पण नंतर पुन्हा भांडण अधिक वाढलं. ते पाहून मी पुन्हा तिला बोललो की, निक्की असं बोलू नको तू शांत बस. तेव्हा ती शांत बसली. ती पुढे काहीच बोलली नाही. तिने कधीच मला प्रतिउत्तर दिलं नाही. बहुतेक तिला समजलं की, मी वारकरी सांप्रादायमधील आहे. तो तिचा गुण मला चांगला वाटला. कोणाशी कसं वागायचं या खूप गोष्टी तिच्या डोक्यात सुरु असतात”.
आणखी वाचा – “तिथे शांत बसू नकोस”, पॅडीसाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “तुझ्या माणसांच्या मदतीसाठी…”
पुढे ती म्हणाली, “तिने माझा कधीच अवमान केला नाही किंवा अपशब्द बोलली नाही. इतर सदस्यांबरोबर बोलताना ती खूप रागात असते. वर्षा ताईंबरोबर तिचं असलेलं वागणं तर संपूर्ण महाराष्ट्र बघतच आहे. त्या भांडणादरम्यान मी ताईंनाही शांत बसायला सांगितलं. त्याही शांत बसल्या. निक्कीबरोबरच वर्षा ताईही गोष्टी ताणून धरतात. पण हे ताईंनी करु नये. कारण इथून पुढे काळ मोठा आहे. दोघींनीही समजून घेतलं पाहिजे”, असं म्हटलं.