नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज यासारख्या अनेक माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून विशाखा यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. विशाखा यांनी पोट धरुन हसवणाऱ्या विनोदी भूमिकेसह खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या विशाखा या ‘शुभविवाह’ या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. (Vishakha Subhedar On bigg boss marathi)
विशाखा सुभेदार या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे कामाबद्दलची माहितीही शेअर करत असतात. अशातच त्यांनी फ्रेंडशिप डे निमित्त एक खास पोस्ट शेअर करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत विशाखा यांनी त्यांचा जिवलग मित्र पॅडी कांबळेची आठवण काढली आहे. सध्या पॅडी कांबळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे.
आणखी वाचा – “तिथे शांत बसू नकोस”, पॅडीसाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “तुझ्या माणसांच्या मदतीसाठी…”
‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आणि नुकत्याच सुरु झालेल्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ने साऱ्यांना वेड केलं आहे. हा कार्यक्रम साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यंदाच्या या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत. विशाखा यांनी मैत्री दिनादिवशी पॅडीची आठवण काढत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट करत विशाखा यांनी ‘बिग बॉस’मध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – Video : लग्नानंतर बदलतो नवरा, जिनिलीया देशमुखच्या Birthday साठी रितेश देशमुखचा व्हिडीओ, म्हणाला, “बायको…”
या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत, “‘बिग बॉस’मध्ये तुम्ही हव्या होत्या”, असं म्हटलं आहे. यावर विशाखा यांनी कमेंट करत, “पुढल्या वेळीस”, असं म्हटलं आहे. तर आणखी एका चाहतीने कमेंट करत, “ताई तुम्ही ‘बिग बॉस’मध्ये असायला हवं होतं”, असं म्हटलं आहे. यावरही त्यांनी कमेंट करत, “पुढल्या वेळी”, असं म्हणत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. आता पुढच्या वर्षी ‘बिग बॉस’च्या घरात खरंच विशाखा सुभेदार जाणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.