शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Lal Salaam Teaser : हटके लूक, धडाकेबाज अ‍ॅक्शन अन्…; ‘लाल सलाम’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ७३व्या वर्षीही रजनीकांत यांची मेहनत पाहून प्रेक्षक भारावले

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 13, 2023 | 1:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
rajnikanth new movie lal salaam teaser released

rajnikanth new movie lal salaam teaser released

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सूपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचा काही वेगळंच क्रेझ पाहायला मिळतो. अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली. त्यांचं वय ८०च्या पार असलं तरीही ते अ‍ॅक्शन सीन तितक्याच दमदार पद्धतीने करताना दिसतात. आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन चित्रपटाचा फस्ट लूक आणि टीझर प्रदर्शित केला आहे. रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या चित्रपटातील लूकची बरीच चर्चा होताना दिसते.  (rajnikanth new movie lal salaam teaser released)

‘लाल सलाम’ चित्रपटाच्या टीझरमध्ये रजनीकांत मोइनुद्दीन भाई या पात्रात दिसत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांचा कधीही न पाहिलेला असा हटके अंदाज पाहायला मिळतो. टीझरच्या सुरुवातीला रजनीकांत तपकिरी रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाच्या पायजम्यात त्यांच्या बंगल्यातून बाहेर येताना दिसतात. त्यानंतर कारखान्याकडे एक गाडी जाताना दिसते. तिथे निळ्या रंगाच्या कपड्यात बरेच लोकं उभे दिसतात. त्याच दरम्यान त्या शॉटमध्ये बरेच अ‍ॅक्शन सीन पाहायला मिळतात. तर रजनीकांत त्यांच्या हातात एक मोठी साखळी फिरवताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Video : रिसेप्शन पार्टीत रणदीप हुड्डाच्या बायकोचा भन्नाट डान्स, पारंपरिक लूकमध्ये दिसली अन्…; व्हिडीओ चर्चेत

या टीझरमध्ये रजनीकांत यांचा भन्नाट अ‍ॅक्शन अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर नंतर दुसऱ्या बाजूला इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण दिसत आहे. तर प्रकाशात एका व्यक्तीची सावली नमाज पठण करताना दिसत आहे. रजनीकांत यांच्या वाढदिवसादिवशी शेअर केलेल्या या टीझरमध्ये चांगलीच अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे. एआर रेहमानच्या ‘जलाली जलाल बजता है’ हे गाणं टीझरच्या पार्श्वभूमीला वाजत आहे. या गाण्यामुळे अ‍ॅक्शन सीन आणखीनच प्रभावी वाटत आहे.

आणखी वाचा – धक्कादायक! प्रसिद्ध मीडिया इन्फ्लुएन्सरची आत्महत्या, मृत्यूपूर्वी स्वतःसाठीच लिहिली श्रद्धांजली पोस्ट अन्…

रजनीकांत यांच्या नवीन चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा चित्रपटातील हा अंदाज रजनीकांत यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढवताना दिसत आहे. जरी या टीझरमध्ये रजनीकांत यांची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Tags: bollywoodlal salaamnew movierajnikanthteaser released
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
mugdha vaishampayan and prathamesh laghate shared special photos on instagram and singer gave answer to troller

"सतत दात काढत असता", मुग्धाने वैशंपायने होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करताच नेटकऱ्याने सुनावलं, प्रथमेश लघाटे म्हणाला, "तुम्हालाच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.