बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक रणदीप हुड्डा याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. रणदीपने त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर म्हणजेच लिन लैशरामबरोबर सात फेरे घेतले आहेत. त्यानंतर या नवविवाहीत जोडप्याची रिसेप्सन पार्टी आयोजित करण्यात आली होती. काल रात्री (११ डिसेंबर) या जंगी पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं. ज्यात बॉलिवूडच्या बऱ्याच सिताऱ्यांनी हजेरी लावली. या पार्टीतील एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात रणदीपची बायको लिन रणदीपसह भन्नाट डान्स करताना दिसली. (lin laishram dance with randeep hooda)
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात नव वर व वधू भन्नाट डान्स करताना दिसली. व्हिडीओमध्ये लिन मरुन रंगाच्या साडीत दिसली होती. त्यात तिने सुंदर दागिने घातले होते. तिचा हा पारंपरिक अंदाज सगळ्यांच लक्ष वेधणारा ठरला. रणदीप काळ्या रंगाच्या सूटमध्ये पाहायला मिळाला. रणदीपने डान्स करत सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं पण लीनच्या डान्सने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांचंही बरंच प्रेम मिळताना दिसत आहे.
नेटकऱ्यांनी लाईक, कमेंट करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘१० वेळा पेक्षा जास्त वेळा पाहिला तरी कमीच वाटत आहे. खूप प्रेम’, असं लिहीत त्याने त्यांच्या डान्स व्हिडीओचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने विनोदी अंदाजात कमेंट केली आहेत तो लिहीतो, ‘वहिनी म्हणते, आज याला काही मी सोडत नाही. चांगलं नाचायलाच लावते’, असं लिहीत त्याने त्या व्हिडीओचं वर्णन केलं.
रणदीप व लिनने २९ नोव्हेंबरला मणिपूरमधील इंफाळमध्ये शाही लग्न केलं. हा लग्न सोहळा अगदी पारंपारीक रितीरिवाजांनी पार पडला. त्यांचा लग्नातील लूक सगळ्यांच लक्ष वेधून घेणारा ठरला. त्यांच्या लग्नाचे फोटो सगळ्यांनाच आवडले. त्यानंतर मुंबईतील लग्नाच्या रिसेप्शनमधील लूकने सगळ्यांच लक्ष वेधलं. यावेळी लिनने चमकदार मरुन रंगा साडी नेसली होती. त्यात तिचं सौंदर्य आणखीनच खुलत होतं. तिने डोक्यावर सारख्या रंगाची ओढणी घेतली होती. तर रणदीप काळ्या रंगाच्या सूटमध्ये पाहायला मिळाला. त्यात तो खूप डॅशिंग दिसत होता.