प्रसिद्ध टीव्ही व बॉलिवूड अभिनेता रोनित रायने काल (२५ डिसेंबर) रोजी पत्नी नीलम बोसबरोबर लग्नाचा २०वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वीस वर्षांच्या संसारानंतर रोनित-नीलम यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. रोनितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मुझसे शादी करोगी? फिर से” असं कॅप्शन लिहित रोनितने हा व्हिडीओ शेअर केला केला आहे. एका मंदिरात मोजक्या कुटुंबीयांच्या व पाहुण्यांच्या उपस्थितीत रोनित-नीलम यांनी एकमेकांबरोबर लग्न केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या लग्नसोहळ्यात त्यांचा मुलगादेखील साक्षीदार होता. (Ronit Roy On Instagram)
रोनितने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघे पती-पत्नी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न करताना दिसत आहेत. या खास लग्नसोहळ्याला रोनितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता, तर नीलमने लाल रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. ‘दुसऱ्यांदा काय, हजार वेळा मी तुझ्याशीच लग्न करेन. लग्नाच्या २०व्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा’, असं कॅप्शन देत रोनितने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओखाली एकाने “लोक पाच वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत आणि तुम्ही लग्नाच्या वीस वर्षांनंतर पुन्हा लग्न करत आहात. खूपच सुंदर” तर दुसऱ्याने “खरं प्रेम या जगात अस्तित्वात आहे” असं म्हणत कमेंट केली आहे. त्याचबरोबर अनेकांनी दोघांना कमेंट्सद्वारे आशीर्वाददेखील दिले आहे.
दरम्यान, रोनितचं हे दुसरं लग्न असून त्याचं पहिलं लग्न हे जोआनाबरोबर झालं होतं. पण काही कारणांनी ते विभक्त झाले. त्यानंतर रोनित अभिनेत्री नीलम सिंहबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यानंतर एकमेकांना तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी एकत्र संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. नीलमने याआधी ‘सिलसिला है प्यार का’, ‘सुराग’ अशा अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आणखी वाचा – प्रसिद्ध कॉमेडियन नील नंदाचे निधन, वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
रोनित हादेखील छोट्या पडद्यावरील खूपच लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘कसौटी जिंदगी की’, ‘मिस्टर बजाज’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने आजवर पती, वडील व मुलाची भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या अभिनयासाठी त्याला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.