सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : सुशांत सिंग राजपूतचे इंटिमेट सीन पाहिल्यानंतर अंकिता लोखंडेची झालेली अशी अवस्था, म्हणाली, “आम्ही जवळीक साधायचो तेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 26, 2023 | 1:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

सुशांत सिंग राजपूतचे इंटिमेट सीन पाहिल्यानंतर अंकिता लोखंडेची झालेली अशी अवस्था, म्हणाली, "आम्ही जवळीक साधायचो तेव्हा…"

Bigg Boss 17 Latest News : अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’ मुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर अंकिताने अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल खुलासा केला आहे. अंकिताने सांगितले की, सुशांतने त्याच्या ‘पीके’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते. अंकिताला पडद्यावर इंटिमेट सीन करताना बघणे आवडणार नाही हे त्याला चांगलेच माहीत होते.

‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोमध्ये अंकिता अभिषेकसह सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसत आहे. रिलेशनशिपमध्ये पझेसिव्ह असणं किती महत्त्वाचं आहे यावर दोघं चर्चा करताना दिसत आहेत. अंकिताने ती सुशांतला डेट करतानाचा काळ आठवला. सुशांतचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ रिलीज झाला तेव्हा अंकिताने चित्रपटात दाखवलेले इंटिमेट सीन्स एकट्याने पाहावेत अशी त्याची इच्छा होती.

आणखी वाचा – “कुलकर्णींची सून…”, स्वानंदी टिकेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, बायकोला लाजताना पाहून आशिषही हसला अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

याबाबत अंकिता म्हणाली, “सुशांतने माझ्यासाठी संपूर्ण हॉल बुक केला होता. त्या हॉलमध्ये फक्त मी व सुशांत होतो. अशी दृश्ये पाहून मला राग येईल हे त्याला माहीत होते. मी ती दृश्ये पाहिली. संपूर्ण चित्रपट संपल्यावर आम्ही घरी गेलो आणि खूप रडलो. घरी आल्यावर त्याने माझी माफी मागितली असली तरी ते दृश्य माझ्या मनातून हटत नव्हते”.यापुढे अंकिता म्हणाली, “चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हाही मी व सुशांत एकमेकांशी जवळीक साधायचो, तेव्हा मला सारखेच फ्लॅशबॅक आठवायचे. ती दृश्ये सारखी माझ्या मनात यायची आणि मी त्याकडे दुर्लक्ष करायची. तुमचा प्रियकर दुसर्‍याशी जवळीक साधताना पाहून कोणालाच आनंद वाटत नसेल”.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचा असा पार पडला साखरपुडा सोहळा, फोटो आले समोर

त्यावेळी अंकिताला असं विचारण्यात आलं की, सुशांतने चित्रपटातील कोणत्याही सहकलाकाराला किस करण्याची परवानगी घेतली होती का? यावर उत्तर देत अंकिताने होकार दिला. अंकिता म्हणाली, “मी कोणाच्याही करिअरच्या आड येऊ शकत नाही. पण हो, अशी दृश्ये पाहणे ही वेगळी गोष्ट आहे”. सुशांतचा ‘पीके’ चित्रपटाची आठवण काढत म्हणाली, “या चित्रपटातील अनुष्का शर्माबरोबरच्या इंटीमेट सीनमुळे मला त्रास झाला. ‘पीके’ बघताना मला चक्कर आली होती” असंही अभिनेत्री म्हणाली.

Tags: ankita lokhandebigg boss 17Bigg Boss 17 Latest Newsentertainmentsushant singh rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
digpal lanjekar directorial shivrayancha chhava marathi movie new poster is out

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवरायांचा छावा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकाणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.