मनोरंजन विश्वातून नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉस एंजेलिस येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाचा स्टँड-अप कॉमेडियन नील नंदा याचे वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी नील नंदाचे निधन झाल्याची बातमी अनेकांच्या काळजाला चटका लावणारी आहे. या प्रसिद्ध कॉमेडियनने वाढदिवसानंतर काही दिवसातच नील नंदाचं निधन झाल्याने अनेकांना दु:ख झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Comedian Neel Nanda Death)
नील नंदा हा ‘जिमी किमेल लाईव्ह’साठी, त्याचबरोबर कॉमेडी सेंट्रलच्या अॅडम डिव्हाईनच्या हाऊस पार्टीमध्ये स्टँडअप कॉमेडीसाठी प्रसिद्ध होता. त्याचे अनेक चाहते त्याचा शो पाहण्यासाठी उपस्थित राहायचे. त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंगदेखील जबरदस्त होती. मात्र, कॉमेडीयनच्या अचानक निधनाच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नीलच्या मृत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच त्याच्या कुटूंबियांनीदेखील याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.
आणखी वाचा – गौतमी व स्वानंदी पाठोपाठ ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण
नीलचा मॅनेजर ग्रेग वेइस याने एका दिलेल्या एका वृत्तात त्याने दु:ख व्यक्त केले आहे. “२४ डिसेंबरला नीलच्या मृत्यूची बातमी ऐकताच मला खूप मोठा धक्का बसला. नील एक विनोदी अभिनेता होताच, याशिवाय तो एक चांगला माणूसदेखील होता. येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याचे अनेक शो होते. पण तो आता या जगात नाही आहे.” असं म्हणत ग्रेग वेइस याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अखेर स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी अडकले लग्नबंधनात, नववधूवराच्या साधेपणाची चर्चा
नील नंदा यांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून सांगण्यात आलेले नाही असं म्हटले जात आहे. दरम्यान, नील हा मूळ भारतीय होता, जो लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. त्याला लहानपणापासूनच कॉमेडीची आवड होती. पुढे याच क्षेत्रात त्याने आपले करिअर केले. त्याच्या या निधनाच्या बातमीने अनेक चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.