मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठीतील अनेक कलाकार एकामागोमाग एक विवाहबंधनात अडकत आहेत. मुग्धा-प्रथमेश यांच्या पाठोपाठ काल (२५ डिसेंबर) गौतमी-स्वानंद व स्वानंदी-आशिष या कलाकार जोड्याही विवाहबंधनात अडकल्या. अशातच आता छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री सोनल पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. (Sonal Pawar On Instagram)
नुकताच सोनलचा मेहंदी सोहळा पार पडला असून याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मेहंदी सोहळ्यातील तिच्या खास लूकने व तिने हातावर काढलेल्या मेहेंदीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच आता तिच्या हळदी समारंभालादेखील सुरुवात झाली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर स्वतःच्या मेहंदी समारंभाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी काढलेली दिसत आहे. तिच्या हळदी समारंभाचे खास क्षण या व्हिडीओद्वारे शेअर करत तिने या व्हिडीओखाली “असा कसा बाई मला तुझा रंग लागला” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर यापुढे तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅगही केलं आहे.
मेहंदीच्या समारंभासाठी सोनलने खास भगव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या हातावर आणि पायावर सुंदर मेहंदी काढली आहे. सोनलच्या मेहंदीमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीरसह, शिवनेरी बस, मस्तानी, मुंबई असं लिहिलेलं दिसत आहे. सोनलच्या मेहंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओवर तिच्या नवऱ्यानेही कमेंट केली आहे.
दरम्यान, सोनलचा होणारा नवरा समीर पालुष्टे हा एक व्यावसायिक आहे. तो स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर व सीईओ आहे. तसेच समीर डिजिटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो. येत्या २८ डिसेंबरला सोनल समीर पालुष्टेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच सोनलणे आत्तापर्यंत अनेक मालिकांमधून काम केले आहे. तिची ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील रुपालीची भूमिका चांगलीच गाजली होती.