बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीची पाठवणी करताना आईला कोसळले रडू, लग्नाला २ महीने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने शेअर केले भावुक क्षण

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 27, 2024 | 11:05 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde shared special photos on the occasion of completing 2 months of her marriage

लेकीची पाठवणी करताना आईला कोसळले रडू, लग्नाला २ महीने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने शेअर केले भावुक क्षण

छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री तितिक्षा तावडे ही नुकतीच विवाहबंधनात अडकली. २६ फेब्रुवारी रोजी तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या लग्नातील खास लूकचीही बरीच चर्चा रंगली होती.

अशातच या दोघांच्या लग्नाला काल (२६ एप्रिल) रोजी दोन महीने पूर्ण झाले आणि या दोन महिन्यांच्या पूर्तीनिमित्त दोघांनी त्यांच्या लग्नातील काही खास क्शन नव्याने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. खुशबू-सिद्धार्थ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे त्यांच्या लग्नाची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. तितीक्षाने शेअर केलेल्या या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ???? The Shutter Key Film & Photography. (@theshutterkey)

आणखी वाचा – कुर्यात सदा मंगलम्! ‘आई कुठे…’ मधील यश व आरोहीचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिल्या फोटोमध्ये सिद्धार्थ-तितीक्षा एन्ट्री घेतानाचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे, याचसह तिसऱ्या फोटोमध्ये लग्नातील पारंपरिक विधी करतानाचे पाहायला मिळत आहे. चौथा फोटो मात्र खूपच भावुक करणारा आहे, या फोटोमध्ये तितीक्षा व आई एकमेकांना मिठी मारत भावुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर इतर फोटोमध्ये सिद्धार्थ-तितीक्षा यांच्या लग्नातील विधींचा व धमाल मज्जा-मस्ती करतानाचे काही खास क्षण पाहायला मिळत आहे.    

आणखी वाचा – बेपत्ता होण्याआधी ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने ‘या’ व्यक्तीला पाठवला होता मॅसेज, एअरपोर्टवर घ्यायलाही पोहोचली पण…

तितीक्षाने लग्नात ऑफव्हाईट रंगाची गोल्डन काठाचा पदर आणि त्यावर गोल्डन बुट्ट्या असणारी साडी नेसली होती. या लूकमध्ये तितीक्षा खूपच सुंदर व लोभसवाणी दिसत होती. तर सिद्धार्थनेदेखील तितीक्षाच्या लूकला साजेशी अशी ऑफव्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्यांचे हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, या फोटोवर  मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांसह तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newstiteeksha tawdeTiteeksha Tawde Marriage News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Vidya Balan Reveals Addicted to Smoking

सिगारेटचं व्यसन, धूम्रपान करण्याची आवड अन्…; विद्या बालनने स्वतःबद्दलच केला खुलासा, म्हणाली, "व्यसन करायला खूप आवडतं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.